ठाणे येथील घटनेचा अधिकाऱ्यांनी केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:23+5:302021-09-02T05:15:23+5:30
या घटनेचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग मु्ख्याधिकारी संघटना जिल्हा शाखेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच हल्लेखोरावर कठोर कारवाई ...
या घटनेचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग मु्ख्याधिकारी संघटना जिल्हा शाखेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी कामकाज बंद करून सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाने यात सहभाग नोंदवला. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग मु्ख्याधिकारी संघटना जिल्हा कार्यकारिणीद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.