अवंतीबाईची वीरकथा प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:53 PM2019-03-20T21:53:34+5:302019-03-20T21:53:53+5:30

ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सन १८५७ ची स्वतंत्र संग्राम विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

Avantibai Veerakha Inspirational | अवंतीबाईची वीरकथा प्रेरणादायी

अवंतीबाईची वीरकथा प्रेरणादायी

googlenewsNext
ठळक मुद्देरिता मसरके : देव्हाडी येथे शहीद राणी अवंतीबाई बलिदान दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सन १८५७ ची स्वतंत्र संग्राम विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी देव्हाडीचे सरपंच रिता मसरके, उपसरपंच लव बशीने, ग्रामसेवक बावनकुळे, लोधी समाजाचे जिल्हाध्यक्ष अनंतलाल दमाहे, श्यामसुंदर नागपुरे, लोधी प्रचारक खुशाल नागपुरे, ग्रामपंचायत सदस्या राजकुमारी लिल्हारे, कुंदा बोरकर, ललिता नागपुरे, रत्ना मेश्राम, विमल बोंदरे, देवेंद्र शहारे, न्यानेश्वर बिरनवारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच रिता मसरके म्हणाल्या, राणी अवंतीबाई लोधी यांनी देशाचे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि आदरणीय महिलेचा लढा दिला. सर्व प्रथम ब्रिटीशाविरुद्ध तलवार हाती घेतली.
अवंतीबार्इंनी संपूर्ण देशात क्रांतिकारक महिला म्हणून ओळख निर्माण केली. राणी अवंतीबाई लोधी देशातील पहिल्या महिला स्वातंत्र्य संग्राम सेनानी होत्या.
एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीचा पाया त्यांनीच रोवला होता. आजच्या काळात राणी अवंतीबाई यांची विरकथा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन देव्हाडीचे सरपंचा रिता मसरके यांनी केले.
अनंतलाल दमाहे म्हणाले, वीरांगना अवंतीबाई केवळ बालपणीच एक नायक आणि पराक्रमी होते. राजा राजकुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणी अवंतीबाई लोधी यांनी लढा आपल्या हातात घेतला. १८५७ च्या काळात स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले, अवंतीबाईनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रणभूमीवर लढल्या. त्यात त्या अमर शहीद झाल्या. राणी अवंतीबाई केवळ लोधी समाजाच्या ओबीसी महिला नव्हे तर स्वतंत्र भारताच्या गौरव आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Avantibai Veerakha Inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.