लाखनी तालुक्यात ४१९ हेक्टरमध्ये आवत्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:39+5:30
लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी पऱ्हे लावण्यात आली आहेत. तसेच आवत्याची पेरणी केली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील आवत्या व पऱ्हे रखडलेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात खरीप हंगामातील धान रोवणीला प्रारंभ झाला आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १८ हेक्टर क्षेत्रात रोवणी झालेली आहे. ४१९ हेक्टर क्षेत्रात धानाच्या आवत्या टाकल्या आहे. आवत्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६९८ हेक्टर आहे. तालुक्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १४९ मिमी आहे. आतापर्यंत २७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. टक्केवारी १८३.२० आहे. वातावरण ढगाळ व थंड असून कुठेकुठे पावसाच्या तुरळक सरी येत असल्याने धानाची पऱ्हे हिरवीकंच दिसून येत आहेत.
लाखनी तालुक्यात सन २०२०-२१ खरीप हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ६३१ हेक्टर आहे. यापैकी आवत्याचे क्षेत्र ६९८ हेक्टर व धानाचे पऱ्हे नर्सरी २ हजार १९३ हेक्टरवर आहेत. नर्सरी १४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी पऱ्हे लावण्यात आली आहेत. तसेच आवत्याची पेरणी केली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील आवत्या व पऱ्हे रखडलेली आहेत. २२ व २३ जून रोजी पाऊस होताच त्यानंतर पावसाने पुन्हा दांडी मारली आहे.
तालुक्यात तूर पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १९४६ हेक्टर आहे. सध्या तूर ७०६.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. पेरणीचे काम अद्यापही सुरु आहे. तालुक्यात ३२.८० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लावगड झाली आहे. यात भेंडी, चवळी, कारले, मिरची, वांगी, दोडका, लवकीची लागवड केली आहे. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र घटले आहे. सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार ३७७ हेक्टर क्षेत्रा ऊस लागवड केली जायची ते क्षेत्र घटलेले आहे. खरीप तिळ १६७ हेक्टरऐवजी, १० हेक्टर क्षेत्रात लावलेले आहे. उस लागवड करणारे शेतकरी धानाकडे वळले आहेत.
खरीप हंगामात शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. उस, तिळ तसेच बांधावर घेण्यात येणारे पिक कमी झाले आहे. रोवणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयाद्वारे शेतशिवारांना भेट देवुन प्रत्यक्ष माहिती देण्यात येत आहे.
-पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी लाखनी