अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यापेक्षा आळा घाला
By admin | Published: February 10, 2017 12:34 AM2017-02-10T00:34:42+5:302017-02-10T00:34:42+5:30
अंधश्रध्देत ग्रासलेल्या व्यसनाधीन उध्दार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू, महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता
मुनीर शेख यांचे प्रतिपादन : उमरी येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम
चिचाळ : अंधश्रध्देत ग्रासलेल्या व्यसनाधीन उध्दार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू, महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता वर्षानुवर्षे पोखरुन टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करावयाची असेल तर महान तयागी बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्म शिकवणीचा प्रचार प्रसार करणे अत्यंत काळाची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी केले. उमरी येथील व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उमरीच्यावतीने व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक दामोधर जिभकाटे प्रमुख अतिथी म्हणून जयदेव निखारे, मुनिर शेख, देवा भुजाळे, टिकाराम नाव्होकर, अशोक मोहरकर, प्रकाश हातेल, विक्की पचारे, मोहन हरडे, गोपाळा भुजाळे, सरपंचा उमरी शिला चौधरी, आशा भोयर, श्रीहरी गेडेकर, विठ्ठल भुजाडे, मधुकर गडेकर, ताराचंद दहिलकर, गजानन मलोडे, वैशाली भुजाडे, वनिता भुजाडे, कमला दहिलकर, संगिता मलोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन गावातून रॅली काढून रॅलीमध्ये व्यसन मुक्तीचे संदेशाची घोषणा करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुनिर शेख म्हणाले महानत्यागी बाबा जुमदेवजीने अंधश्रध्देने ग्रासलेल्या व व्यसनाधिन कुटूंबाची दारु, सट्टा, जुवा, गाजा आदी वाईट व्यसन हद्दपार करुन शासनाला नाही जमले ते महानत्यागी बाबा जुमदेवजीने मानव धर्माची स्थापना करुन दारुबंदी करुन मद्यप्राशन करणाऱ्या कुटूंबाचे उध्दार केले. त्या महानत्यागी बाबा जुमदेवजीची शासन स्तरावर जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याचे शासनाने दखल घ्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोधर जिभकाटे यांनी बाबानी दिलेले चार तत्व, तिन शब्द, पाच नियमाची उपस्थितांना प्रचित करुन दिली तर देवा भुजाडे यांनी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करुन सन १९४९ ला मानवधर्माची स्थापना करुन मानवाचा जीवन सफल करण्यासाठी बाबानी चार तत्व, तीन शब्द व पाच नियम दिले.
बाबा अंधश्रध्देचा विरोध करीत असत बाबा कोणत्याही सेवकांकडून गुरुदक्षिणा घेत नसत व प्रत्येक आत्म्यात परमेश्वर असल्याने ते पाया पडू देत नव्हते. बाईला तर फार लांब उभे ठेवत असत बाबा नेहमी सत्कर्म करीत असत व सेवकांनाही सत्कर्म करावयास सांगत भगवंताने मानवाला निर्माण केल्याने आपल्या सर्वांचा विधाता एक भगवान आहे, असे सांगत परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी शारीरिक दु:खा बरोबर त्यांनी त्यांचे मानसिक आर्थिक सामाजिक दु:खही दूर झाले असल्याचे म्हणाले.
संचालन ताराचंद दहेलकर आभार मोहन गडेकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी भुजाडे, काशीराम मलोडे, विजय भुजाडे, वंदना चिंचोलकर, माधूरी भुजाडे, अजय भोयर, रामलाल मलोडे, दिनेश भोयर, बळीराम मलोडे व सेवक सेविका यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)