वेतन पथकात रखडलेल्या वैद्यकीय देयकांना अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:23+5:302021-09-02T05:16:23+5:30
मोहाडी : कोविड १९च्या तडाख्यात अनेक शिक्षक कर्मचारी आजारी पडले, तर काहींचा मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती ...
मोहाडी : कोविड १९च्या तडाख्यात अनेक शिक्षक कर्मचारी आजारी पडले, तर काहींचा मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयक वेतन पथकात पडून आहेत. ७९ देयके अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व अधीक्षक वेतन पथक भंडारा यांच्यात पार पडली. संच मान्यता २०१९-२० व २०२१-२२ मधील त्रुट्या दूर करण्यात याव्यात, शाळांत वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे, तसेच वेतन पथकांतील विविध विषयांवर चर्चा झाली. या सभेला भंडारा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, पदाधिकारी अनमोल देशंपाडे, राधेश्याम धोटे, मनोहर मेश्राम, कुंदा गोडबोले, राजू भोयर आदींनी चर्चेत भाग घेतला, तसेच विविध देयके प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मागील दोन वर्षांत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणात मोठ्या संख्येत वाढ झाली आहे. या दोन वर्षांत कोविड १९चा संसर्ग व इतर आजारात वाढ झाली. यात अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. काही कर्मचारी उपचार करून घरी आले.
कोविड १९ काळात कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च अवाढव्य आला. कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे प्रकरणात येणारे अडथळे पार केल्यानंतर देयके वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) कार्यालय भंडारा येथे घातले आहेत. २०२१-२२ मधील ७९ वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे देयक अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत, तसेच रजा रोखीकरणाची ३२ पैकी १४ देयके कोषागारातून दोन वेळा परत केली आहेत. त्रुट्यापूर्ण करून देयके पाठविली जाणार आहेत. शिक्षण उपसंचालक नागपूरकडे २०१९-२० मधील १७६ विलंबाने पाठविलेली प्रकरणे अधीक्षक वेतन पथक भंडारा यांनी सादर केली होती. त्यापैकी ७४ देयक प्रकरणे पारित झाली.२०२०-२१ मधील १०२ प्रकरणे कोविड १० मुळे पारित करण्यात आली नसल्याचे भंडारा वेतन अथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी संघाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. डीसीपीएस धारकांना मिळणाऱ्या सहाव्या वेतनाची थकबाकीची १६ प्रकरण, तसेच पडले आहेत. सातव्या वेतनाच्या थकीत देयकांची संख्या ३८ आहे. निधीअभावी तेही देयके वेतन पथकात पडून आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ताचे देयके प्रलंबित आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्र काढावा, अशीही मागणी करण्यात आली.
बॉक्स
नियमित वेतन व इतर देयके वेतन पथकांनी तयार केलेल्या नमुन्यात देण्यात यावे, तसेच सरळ (डिस्पेच) आवकमध्ये घालावी. ज्येष्ठतेनुसार देयके मंजूर करण्यात यावे. तसे न झाल्यास शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे मुख्याध्यापक संघाच्या सभेत ठरले आहे, तसेच वेतनाच्या अनुदानासाठी शाईच्या प्रती उशिरा येतात. शाईच्या प्रतीची भानगड बंद करण्याची मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.
310821\fb_img_1630387441219.jpg
वेतन पथकात पडलेल्या वैद्यकीय देयकांना अनुदानाची प्रतीक्षा
अनुदान द्या: मुख्याध्यापक संघाची मागणी