हा पुरस्कार सोहळा म्हणजे छोटा नोबल पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:27+5:302021-01-24T04:17:27+5:30
साकोली : माझ्या जीवनातील हा पुण्यतिथी सोहळा अत्यंत अविस्मरणीय आहे. या ठिकाणी विविध पुरस्कारांची मेजवाणी समाजातील सामान्य माणसापर्यंत पोहचत ...
साकोली : माझ्या जीवनातील हा पुण्यतिथी सोहळा अत्यंत अविस्मरणीय आहे. या ठिकाणी विविध पुरस्कारांची मेजवाणी समाजातील सामान्य माणसापर्यंत पोहचत आहे. हा या प्रतिष्ठानाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. शेतकरीसुद्धा हा आपल्या शेतीच्या कार्यातून देशसेवा करीत असतो. माणूस हा अथक प्रयत्नाने घडतो. त्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असणे अतिशय गरजेचे आहे. मानवाचे कार्य महान असले पाहिजे. देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे व हे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली हे समाजातील विविध स्तरातील लोकांची सेवा करीत आहे. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मार्तंडराव कापगते यांच्या १२ व्या पुण्यस्मरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक संजय डोर्लीकर शिक्षणाधिकारी जि.प. भंडारा हे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डोमाजी कापगते संतकवी हे होते. तर अतिथी नरेश कापगते पशुसंवर्धन अधिकारी जि.प. भंडारा, अशोक कापगते माजी जि.प. सदस्य भंडारा, शिवानी काटकर संयोजिका सखी मंच, राजेश धुर्वे सचिव विमाशी भंडारा, यशवदा कापगते व सचिव होमराज कापगते, मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व.मार्तंडराव पाटील कापगते यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी विविध पुरस्कार बहाल करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक पुरस्कार माधवराव जोशी येळेकर उसगाव (चांदोरी), तुळशीराम जागोजी हरडे जांभळी (स), मोतीराम नकटू भोंडे सातलवाडा, रामाजी धोंडूजी हटवार (निलागोंदी), पैकनदास थोडू मेश्राम (बोदरा), शिक्षक पुरस्कार दामोधर फत्थुजी काळे मुख्याध्यापक बोदरा, शेतकरी पुरस्कार योगराज रामकृष्ण गोटेफोडे सासरा व स्व.मंदाताई सुरेश कापगते स्मृती प्रित्यर्थ महिला पुरस्कार म्हणून नयना चेतन चांदेवार सरपंच बांपेवाडा यांना बहाल करण्यात आला. यात पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पदक बहाल करण्यात आले. कर्तबगार महिला पुरस्कार म्हणून अर्चना बावणे मुख्याध्यापक एम.पी.के. विद्यालय जांभळी यांना बहाल करण्यात आला. तर प्रतिष्ठानतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत रेंगेपार (कोहळी) येथील भरत नत्थूजी कावळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रूपेश कापगते यांनी केले तर आभार प्रा. सहसराम बन्सोड यांनी मानले.