जांभोरा बिटात वनाधिकाऱ्यांची जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:09+5:302021-03-24T04:33:09+5:30
करडी(पालोरा) : वनविभाग तुमसर अंतर्गत किसनपूर-जांभोरा बिटातील गावागावात वन वनवा थांबवा, जंगल वाचवा, पाणी, इंधन, चारा, औषधी वनस्पती, फळे, ...
करडी(पालोरा) : वनविभाग तुमसर अंतर्गत किसनपूर-जांभोरा बिटातील गावागावात वन वनवा थांबवा, जंगल वाचवा, पाणी, इंधन, चारा, औषधी वनस्पती, फळे, फुले देणाऱ्या जंगलास आपणच वाचवू या, असे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती व संदेश देण्यात आला.
जंगलात लागून असलेल्या शेतातील धुरे पेटविताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहीती द्यावी, जंगलाला आग लागणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. वन वनवा थांबवा, जंगल वाचला तर आपल्याला शुद्ध हवा व पर्यावरण मिळेल, याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. अभियानाच्या यशस्वितेसाठी किसनपूर व जांभोरा बिटचे राउंड आफिसर टी.एन. कावळे, बी.एच. गजभिये, एस.आर. तादंळे, एम.एल. हाके यांनी पालोरा येथील बाजार चौकात नागरिकांना जनजागृतीच्या दरम्यान माहिती दिली.
यावेळी पालोरा येथील सरपंच महादेव बुरडे, माजी पंचायत समिती सदस्य गणेश कुकडे, ग्रा.पं. सदस्य भोजराम तिजारे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर रोटके व परिसरातील नागरिक उपस्थित होते .