लसीकरणासाठी केली जाते जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:29+5:302021-05-12T04:36:29+5:30
या आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील २६ गावे येत असून, येथील वैद्यकीय अधिकारी पी.डी. शहारे व डॉक्टर कैकाडे व आरोग्याची चमू ...
या आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील २६ गावे येत असून, येथील वैद्यकीय अधिकारी पी.डी. शहारे व डॉक्टर कैकाडे व आरोग्याची चमू अथक परिश्रम घेत असून, परिसरातील आलेली साथ रोखण्यासाठी आरोग्याची सुविधा पुरवित आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याची तपासणी केली जात असून, कोरोना चाचणी केली जात आहे, तसेच लसीकरणावर भर देण्यात आला. गावातील उपकेंद्रांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. या आरोग्य केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविला जात असून, परिसरातील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात.
परिसरातील चांदोरी भिलेवाडा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघाले असता, त्या गावांमध्ये धारगाव आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य चमूने घरोघरी जाऊन गावकऱ्यांची तपासणी केली व त्या गावातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आरोग्य केंद्रामध्ये नुकतेच जिल्हाधिकारी यांनी लस टोचून घेतली, तसेच परिसरातील जनतेनी कोरोनाची लस घेण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी शहारे व डॉक्टर कैकाडे यांनी केली आहे.