बाबा जुमदेवजींनी व्यसनमुक्त समाज घडविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 12:29 AM2017-04-13T00:29:36+5:302017-04-13T00:29:36+5:30

मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी व्यसनाधीन, तणावग्रस्त, पीडित जनतेला दु:ख निवारण्याचा मार्ग दाखविला.

Baba Jumdevji created an addictive society! | बाबा जुमदेवजींनी व्यसनमुक्त समाज घडविला!

बाबा जुमदेवजींनी व्यसनमुक्त समाज घडविला!

Next

परिणय फुके : कोंढा येथे परमात्मा एक सेवक संमेलन
कोंढा (कोसरा) : मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी व्यसनाधीन, तणावग्रस्त, पीडित जनतेला दु:ख निवारण्याचा मार्ग दाखविला. मानवाला जागृत करण्यासोबतच धर्माचे रक्षण आणि समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त केले. अशा थोर विचारांच्या बाबा जुमदेवजींच्या जन्मदिनी शासकीय सुटी जाहीर व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
कोंढा (कोसरा) येथे परमात्मा एक सेवक मंडळातर्फे बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मांगो लिचडे हे होते. यावेळी अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, चेतन भैरम, मार्गदर्शक रामकृष्ण जांभुळकर, दामोधर जिभकाटे, बंडू लक्षणे, अर्जुन भुरे, रामेश्वर बिलवणे, भोजराम लांजेवार, आसाराम माहुरे, मंगल चावरे, हरिश्चंद्र गवळी, पंचायत समिती सदस्या कल्पना गभणे, इस्तारी काटेखाये, गणपत भांडारकर, शंकर वैद्य उपस्थित होते.
यावेळी डॉ.फुके यांनी आमदार निधीतून परमात्मा भवनासाठी दहा लाख रूपये जाहीर केले. मार्गदर्शक दामोधर जिभकाटे यांनी बाबा जुमदेवजी यांनी तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली. त्यानंतर समाजातील सर्वांना सोबत घेऊन कार्य केले. सर्वांनी भेदभाव न करता कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जन्मोत्सवानिमित्त कोंढा (कोसरा) येथे ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सेवकांनी लेझीम नृत्य, झॉकी देखावे काढले. प्रास्ताविक विनोद भुरे यांनी केले. संचालन जयदेव गिरडकर यांनी तर आभारप्रदर्शन रामेश्वर बिलवणे यांनी केले.
रात्री बाबांच्या जीवनावर आधारित आॅर्केस्ट्रा पार पडला. त्यानंतर विनोद भुरे दिग्दर्शित संगीत फळ कर्माचे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंदू कुर्झेकर, प्रकाश कुर्झेकर, राहुल सेलोकर, बंडू जांभुळकर, किशोर बिलवणे, वासुदेव जिभकाटे, हरी जांभुळकर, विलास हटवार, भोला सेलोकर, महेश जिभकाटे, कैलाश वंजारी, गंगाधर रेवतकर, सुरेश बावनकर, सुनिल भिवगडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Baba Jumdevji created an addictive society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.