बाबासाहेबांनी धम्माचा प्रसार व प्रचार करून धम्मक्रांती घडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:02 AM2019-06-05T01:02:10+5:302019-06-05T01:03:08+5:30
तथागत बुद्धांनीे वेद प्रामाण्य, यज्ञयांग, कर्मकांड, हिंसा, पशूबळी, विषमता व चातुवर्ण व्यवस्था नाकारून अहिंसा, समता, प्रज्ञा, शिल, करूणा, मैत्री व बंधुतेवर आधारित बौद्धधम्माची स्थापना करून आणि धम्माचा प्रचार व प्रसार करून प्रथमच धम्मक्रांती घडवून आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तथागत बुद्धांनीे वेद प्रामाण्य, यज्ञयांग, कर्मकांड, हिंसा, पशूबळी, विषमता व चातुवर्ण व्यवस्था नाकारून अहिंसा, समता, प्रज्ञा, शिल, करूणा, मैत्री व बंधुतेवर आधारित बौद्धधम्माची स्थापना करून आणि धम्माचा प्रचार व प्रसार करून प्रथमच धम्मक्रांती घडवून आणली.
सम्राट अशोक यांनीे देशविदेशात धम्माचा प्रचार व प्रसार केला. परंतु, सम्राट अशोकाचा पनतू सम्राट बृहद्रथ यांचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने कपटाने खून करून धम्मक्रांती प्रतिक्रांतीत परावर्तीत केली.
या देशात १२०० वर्ष बौद्ध धम्म नांदत होता त्यानंतर देशातून नामशेष झाला. त्यानंतर अडीच हजार वर्षानंतर बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा धम्मक्रांती घडवून आणली. परंतु, बाबासाहेबांची धम्मक्रांती आज विविध रुपात प्रतिक्रांतीच्या विळख्यात सापडली आहे. या प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी धम्मबंधूंनी सजग प्रहरी बनून एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड यांनी केले.
महाबोधी उपासक संघ नागपूर व बुद्ध विहार चिचाळच्या संयुक्त विद्यमाने जामगाव पुनर्वसन येथे आयोजित १० दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिरात धम्मक्रांती-प्रतिक्रांती या विषयावर ते बोलत होते. अमृत बन्सोड म्हणाले, जेव्हा क्रांतीचा परिवर्तनाचा विचार रुजू होऊ लागते तेव्हा तो उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या प्रतिक्रांतीवादी शक्ती जोर धरू लागतात. या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी षडयंत्रकारी प्रवृत्तीचा शिका, संघटीत व्हा व संघर्ष करून संघटीतपणे मुकाबला केला पाहिजे. बाबासाहेबांची धम्मक्रांती न भुतो न भविष्यतो, अशी होती.
या धम्मक्रांतीतूनच आज बौद्धीक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्रात्यांनी जन्म घेतला आहे. माणूसपणा हरवलेला माणूस आज बाबासाहेबांच्या बुद्धी वैभवाने जग पालथा घालत आहे, असे सांगितले.
प्रास्ताविक व संचालन आयोजक लिमचंद बोधी बौद्ध यांनी, तर आभार जिवन बौद्ध यांनी मानले. शिबिराकरिता अरूण गोंडाणे, गुलाब घोडसे, वतन बौद्ध, ललित मेश्राम, संजय तिरपुडे, राजेश मेश्राम आदींनी सहकार्य केल.