बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार सर्वसामान्यांच्या हिताचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:55+5:30
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा मुळ पाया व सर्वसामान्य तळातील माणसाच्या कल्याणकारी उध्दाराचा पाया होता. स्वातंत्र्य समता व बंधुता ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा मुळ गाभा आहे. समतावादी जाती-धर्माची बंधने झुगारून माणसावर व देशावर प्रेम करणारी संस्कृती विकसीत केल्यास देश विकसीत होईल, असे प्रतिपादन डॉ. अनमोल शेंडे यांनी केले.
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे. त्यांना व्यक्ती म्हणून पुजण्यापेक्षा त्यांची तत्वे आपण आचरणात आणणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तात्विक लढा विषमतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी होता. स्त्री-पुरूष समानेशिवाय देश बळकट होणार नाही. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रास्ताविक डॉ. जगजिवन कोटांगले यांनी संचालन डॉ. रत्नपाल डोहणे यांनी, तर आभार डॉ. नलिनी बोरकर यांनी मानले. यशस्वितेसाठी डॉ. आर.टी. पटले, डॉ. आर.आर. चौधरी, एम.एस. नाकडे, प्रवीण देऊळकर, विजय गणीवर, पोर्णिमा रहांगडाले, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.