झाडाखाली दबून बालकाचा मृत्यू
By Admin | Published: May 29, 2017 12:16 AM2017-05-29T00:16:34+5:302017-05-29T00:16:34+5:30
रविवारला सायंकाळी आलेल्या वादळी पावसादरम्यान आंब्याचे झाड कोसळून एका १२ वर्षीय मुलाच्या जागीच मृत्यू झाला.
खरबी येथील घटना : पावसाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : रविवारला सायंकाळी आलेल्या वादळी पावसादरम्यान आंब्याचे झाड कोसळून एका १२ वर्षीय मुलाच्या जागीच मृत्यू झाला. ही घटना खरबी शेतशिवारात घडली.
प्रतिक त्रिशरथ येळणे रा.बोरी असे मृत बालकाचे नाव आहे. प्रतिकच्या घरापासून १०० ते २०० मीटर अंतरावर आंब्याचे झाड आहे. सायंकाळी वादळवारा आल्यामुळे झाडावरून पडलेले आंबे आणण्यासाठी तो आठ-दहा मुलांसोबत गेला होता. दरम्यान आंब्याचे तेच झाड त्याच्यावर कोसळल्याने तो झाडाखाली दबल्या गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोबतच्या मुलांनी त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रतिक हा विकास हायस्कूलमधील सातवीचा विद्यार्थी होता. तो आजोबांकडे राहत होता. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.