मागासवर्गीयांनी काँग्रेसला बळकट करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:11 PM2018-03-11T22:11:48+5:302018-03-11T22:11:48+5:30

आगामी काळात काँग्रेस पक्षासमोर बरीच आव्हाने आहेत. याला तोंड देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे.

The Backward Classes should strengthen the Congress | मागासवर्गीयांनी काँग्रेसला बळकट करावे

मागासवर्गीयांनी काँग्रेसला बळकट करावे

googlenewsNext
ठळक मुद्देकिशोर गजभिये : प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत उपसमिती अनुसूचित जातीची बैठक

आॅनलाईन लोकमत
भंडारा : आगामी काळात काँग्रेस पक्षासमोर बरीच आव्हाने आहेत. याला तोंड देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. याशिवाय जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मागसवर्गीय समाजाने काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहून पक्ष बळकट करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती उपसमितीच्या बैठकीत माजी जिल्हाधिकारी व उपसमितीचे नागपूर विभागीय अध्यक्ष किशोर गजभिये यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत अनुसूचित जाती उपसमिती गठीत करण्यात आली त्यामध्ये नागपूर विभागाची जबाबदारी माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांच्यावर सोपविण्यात आली त्या समिती मध्ये माजी राज्यमंत्री बंड सावरबांधे, माजी गोंदिया अध्यक्ष कृष्णकुमार शेंडे, शकूर नागाणी, सुरेश भोयर सदस्य म्हणून आहेत. विदर्भात राखीव मतदार संघात कॉंग्रेस पक्षा तर्फे समन्वय साधून कॉंग्रेस पदाधिकाºया सोबत बैठकीची जबाबदारी देण्यात आली त्या अनुषंगाने ०९ मार्चला विश्रामगृह येथे उपसमितीची बैठक पार पडली. कॉंग्रेस पदाधिकाºयांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व मते मांडण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले.
या बैठकीमध्ये किशोर गजभिये नागपूर विभागीय प्रमुख अनु.जाती विभाग उपसमिती, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे , माजी आमदार आनंदराव वंजारी, के.आर. शेंडे, शकूर नागाणी, प्रकाश पचारे, कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर लिचडे , प्रमोद तितिरमारे सचिव प्रदेश कॉंग्रेस, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, जि.प. सभापती प्रेम वणवे, जि.प.सदस्य प्यारेलाल वाघमारे, विकास राऊत, युवराज वासनिक, राजकुमार मेश्राम, शमीम शेख, अवैस पटेल, धनंजय तिरपुडे, अनिक जमा, मनोज बागडे, अजय गडकरी, राजकपूर राऊत, शिशिर वंजारी, सचिन घनमारे, मनोहर उरकुडकर, अमर रगडे, शंकर राऊत, के.के.पंचबुधे, प्रसन्ना चकोले, निलेश सावरबांधे, भूषण टेंभूर्णे, मुकुंद साखरकर, सचीन फाले, इम्रान पटेल, कमलेश बाहे, भारती लिमजे, जयश्री बोरकर, जाबीर मालाधारी, गणेश लिमजे, जितेंद्र रंगारी, जावेद शेख, पराग सुखदेवे, हिरामण लांजेवार,मंगेश हुमणे, सचिन गिºहेपुजे, नीरज गौर, पृथ्वी तांडेकर, बंडू ढेंगे पंचायत समिती सभापती , विनीत देशपांडे, निखिलेश गजभिये, कमलाकर रायपूरकर, शालिक भुरे, द्वारकानाथ गोंडाणे, दिलीप देशमुख, रिजवान काजी, शहापूरचे सरपंच मोरेश्वर गजभिये, गौतम नागदेवे, जीवन भजनकर, संजय मते, आशिष नागपुरे, सुहाश गजभिये इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे संचालन डॉ. विनोद भोयर यांनी केले.

Web Title: The Backward Classes should strengthen the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.