सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:00 AM2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:46+5:30

योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे.  २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे.

Backwaters seep into city due to poor planning | सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

googlenewsNext

इंद्रपाल कटकवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असताना त्यात अंतर्भूत असलेल्या बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. गोसेच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसत असून, सुरक्षा भिंतीच्या सदोष नियोजन असल्याचे समोर आले आहे. योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे. 
२४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भंडारा शहराला बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून दीड दशकापूर्वी भंडारा शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यावेळी सुरू झालेले बांधकाम सदोष नियोजनामुळे पूर्ण झाले नाही. आता १ नोव्हेंबर २०२१ पासून वैनगंगा नदीचा जलस्त्रोतात सातत्याने वाढत आहे.
ठराविक मर्यादेपर्यंत पाण्याची पातळी वाढविण्यात येत असल्याने पूर्व मध्य भागातील वस्तीमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अंडरग्राउंड बोगद्यातून बॅकवॉटर ग्रामसेवक कॉलनी ते भंडारा-वरठीपर्यंतच्या शिवारात साचले जात आहे. एकीकडे काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन सुरक्षाभिंत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे आता चक्क नागरिकांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोट्यवधीचा चुराडा
- शहराच्या सभोवताल ते पिंडकेपारपर्यंत असा एकूण दहा किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या प्रस्तावित बांधकामाची किंमत जवळपास ९० कोटींच्या घरात होते. या भिंतीचे बांधकाम दशकभारपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्णतः थांबले आहे. खऱ्या अर्थाने  भिंतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर तर शहरात शिरलेत यासोबतच असंख्य समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. ९० कोटींचे बांधकाम आता २०० कोटींच्या वर पोहोचले असताना कोट्यवधींचा चुराडा करून उपयोग काय? असेही नागरिक बोलू लागले आहेत. 
 

 

Web Title: Backwaters seep into city due to poor planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.