बडतर्फे कामगारांना पूर्ववत करणार

By Admin | Published: February 1, 2016 12:38 AM2016-02-01T00:38:53+5:302016-02-01T00:38:53+5:30

युनिडेरीडेंट कारखान्यातील बडतर्फे रोजंदारी कामगारांना व्यवस्थापन पुर्ववत कायम ठेवणार असून यापुढेही व्यवस्थापन कामगारांना कामावरुन कमी करणार नाही, ...

Badas will undo workers | बडतर्फे कामगारांना पूर्ववत करणार

बडतर्फे कामगारांना पूर्ववत करणार

googlenewsNext

युनिडेरीडेंटचे व्यवस्थापन नमले : कामगार आयुक्तांच्या बैठकीत घेतला निर्णय
तुमसर : युनिडेरीडेंट कारखान्यातील बडतर्फे रोजंदारी कामगारांना व्यवस्थापन पुर्ववत कायम ठेवणार असून यापुढेही व्यवस्थापन कामगारांना कामावरुन कमी करणार नाही, अशी हमी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीनी भंडारा येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. या प्रकरणाचे सविस्तर उत्तर ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.
युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने गुरुवारी, कपंनी व्यवस्थापनाने १०० रोजंदारी कामगारांना कामावर घेतले नाही. यामुळे कामगार व कपंनी व्यवस्थापनात तणाव निर्माण झाला. अस्थायी कामगारांनी संघटनेचा कारखान्याबाहेर लावलेला फलक उखडून टाकण्यात आला. याची तक्रार कामगारांनी पोलीस ठाण्यात दिली. कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुध्दे यांच्या नेतृत्वात कामगारासोबत कामगार आयुक्त जे. ए. बोरकर यांची भंडारा येथे कार्यालयात भेट घेवून निवेदन दिले. कामगार आयुक्तांनी व्यवस्थापनाला पाचारण केले. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून कारखान्याचे व्यवस्थापक जुनारकर व चक्रवर्ती भंडारा येथे हजर झाले.
बैठकीत कामगार संघाचे अध्यक्ष पंचबुध्दे यांनी सदर कामगार १० ते १५ वर्षापासून कारखान्यात काम करत असून उत्पादन प्रक्रियेत सहभागी आहेत. आॅपरेटर, मदतनीस कामे करीत असल्यावरही व्यवस्थापन मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे. कारखान्यात यंत्रावर काम करीत असल्याचा कामगारांचे छायाचित्र पूरावा म्हणून दाखविण्यात आले. कामगारांची वरिष्ठ यादी सादर करण्यात आली. व्यवस्थापनाने कामगार उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करतात हे मान्य केले.
बदली कामगार म्हणून यंत्रावर कामे करतात हेही मान्य केले. कामगारांची वरिष्ठ यादी तपासून बघावी लागेल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. येथे कामगारांना शासनाचे किमान वेतन अधिनियमानुसार व्यवस्थापन अंमलबजावनी करीत नाही. बैठकीत व्यवस्थापन प्रतिनिधीनी कामगारांना कामावरुन बंद केलेले नाही. तसेच चर्चेदरम्यान व्यवस्थापन कामगारांना कामावरुन बंद करणार नाही. आज तारखेपर्यंत कामगारांना बंद केलेले नाही, अशी लेखी हमी व्यवस्थापन प्रतिनिधीनी दिली.
या बैठकीत भंडारा जिल्हा कामगार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुध्दे, रामदास हलमारे, कार्याध्यक्ष कैलास दामन, महासचिव मुरलीधर, सहसचिव चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, हरिश कहालकर, मुकूंद बांतेसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Badas will undo workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.