उड्डाणपुलासाठी वीज खांब ठरला अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:38 PM2018-05-24T22:38:05+5:302018-05-24T22:38:22+5:30
देव्हाडी रेल्वे उड्डाणपुल बांधकामात रेल्वे ट्रॅकवरील वीज पॅनल खांब अडसर ठरत असल्याने मागील एक महिन्यापासून उड्डापूलाचे बांधकाम रखडले आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी रेल्वे उड्डाणपुल बांधकामात रेल्वे ट्रॅकवरील वीज पॅनल खांब अडसर ठरत असल्याने मागील एक महिन्यापासून उड्डापूलाचे बांधकाम रखडले आहे. रेल्वेच्या स्थापत्य व वीज अभियंत्यांनी पाहणी केली. पॅनेल खांब काढण्याकरिता पर्यायी व्यवस्था शोधली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या मंजूरीनंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासन येथे ८० मीटरचे बांधकाम करणार आहे. पुन्हा एकदा उड्डाणपुलाचे बांधकाम रखडलेले आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी रेल्वे काँग्रीस क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर उड्डाणपूल बांधकाम करीत आहे. रेल्वे क्रासींगवर ८० मीटरचे बांधकाम रेल्वे प्रशासनाकडे आहे. रेल्वे ट्रॅकदरम्यान वीज पॅनेल खांब येथे बांधकामाला अडसर इरला आहे. सिमेंट पिल्लर (खांब) येथे करावयाचे आहे. १४ कोटींचे बांधकाम रेल्वे प्रशासनाकडे आहे. २५ हजार उच्च दाबाची (केव्ही) वीज वाहिन्या आहेत. बांधकाम करतांनी वीज तारांचे खांब मुळ जागून दुसरीकडे हलविण्याकरिता रेल्वे प्रशासनात हलचल सुरु आहे. बिलासपूर मुख्य कार्यालय व नागपूर विभागीय रेल्वेचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अभियंत्यानी पाहणी करुन तसा अहवाल बिलासपूर विभागाला सादर केला आहे. बिलासपूर विभागाकडून अजूनपर्यंत मंजूरी मिळालेली नाही, अशी माहिती आहे.
देवरी येथील उड्डाणपुलाची एकूण किंमत ३९ कोटी इतकी आहे. त्यात १५ कोटी राज्य शासन तर उर्वरित १४ कोटींचे बांधकाम रेल्वे प्रशासन करीत आहे. राज्य शासनाचे ७५ टक्के कामे झाली आहेत.
रेल्वे प्रशासनाला रेल्वे टॅÑकवरील मुख्य बांधकाम करावयाचे शिल्लक आहे. रेल्वे ट्रॅकवरील बांधकामाचा मुख्य अडथळा दूर करण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.
मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्ग असल्याने मेगाब्लॉक किती घ्यावा लागणार याची जुडवाजुडव करण्याची तयारी रेल्वेने सुरु केली आहे. रेल्वेच्या कंत्राटदाराने रेल्वे फाटकाजवळ मोठी यंत्रे व इतर साहित्य आणून ठेवले आहेत. परंतु मुख्य अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत कामे खोळंबली राहणार आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोडी नेहमीच राहते. हे विशेष. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क केल्यावर त्यांनी माहिती सांगण्यास असमर्थता दर्शविली.