बीएलओंची बैठकीला दांडी

By admin | Published: October 11, 2015 02:00 AM2015-10-11T02:00:07+5:302015-10-11T02:00:07+5:30

नगरपंचायत साकोलीच्या सभागृहात आज दुपारी १२ वाजता बीएलओची बैठक बोलाविण्यात आली होती.

BAL meeting meeting | बीएलओंची बैठकीला दांडी

बीएलओंची बैठकीला दांडी

Next

शिक्षक परतले : शिक्षक संघटनेचा बीएलओच्या कामांना विरोध
साकोली : नगरपंचायत साकोलीच्या सभागृहात आज दुपारी १२ वाजता बीएलओची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला निवडणूक विभागाचे एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित न झाल्याने अखेर ३ वाजतादरम्यान शिक्षक परत गेले.
या संदर्भात निवडणूक विभागात चौकशी केली असता शिक्षक साहित्य घेण्यास तयार नसल्याची माहिती मिळाली व बीएलओच्या कामावर बहिष्कार करून तहसिलदार यांना निवेदन देण्याच्या तयारीत असल्यामुळे अधिकारी बैठकीच्या ठिकाणी पोहचले नाही अशी माहिती मिळाली.
निवडणूक विभागाने तालुक्यातील सर्व बीएलओची बैठक आज दि. १० ला दुपारी १२ वाजता नगरपंचायत साकोली येथे बोलावली होती. या बैठकीत माहिती सांगून मतदार याद्याविषयी साहित्य वाटप करण्यात येणार होते. त्यामुळे या बैठकीला तालुक्यातील सर्वच बीएलओ हजर झाले होते. मात्र १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत शिक्षकांनी वाट पाहिली. तरी निवडणूक विभागाचा कोणताही कर्मचारी वा अधिकारी इकडे फिरकला नाही. शेवटी शिक्षक घरी परत गेले.
आज या बैठकीला सर्व बीएलओ उपस्थित झाले असले तरी सर्वच बीएलओचा या प्रक्रीयेवर बहीष्कार होता. त्यामुळे सर्व बीएलओ बैठकीला उपस्थित झाले तरी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका साकोली, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी बहिष्कार टाकून निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यासाठी निवेदन तयार केले होते. मात्र बैठकीला एकही अधिकारी उपस्थित झाले नाही.
त्यामुळे हे निवेदन देण्यातच आले नाही. मात्र बीएलओचे काम करणार नाही अशी भूमिका संघटनेचे राजेश सूर्यवंशी, अविनाश शहारे, सरिता भुरे, उमा भुरे, अनिल खंडाईत, सेवकराम हटवार, संजीव खंडाईत, सुरेश ताराम, बाळकृष्ण कापगते, शिवकुमार भगत, संजय नंदेश्वर, विजय वाघाडे, राकेश चिचामे, शिलकुमार वैद्य, देवराम थाटे, एच.के. लंजे, योगेश पटले, मंगला पटोले, पी.टी. हातझाडे, अशोक हजारे, रमेश पारधीकर यांच्यासह संघटनेच्या शिक्षकांनी घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BAL meeting meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.