बालाघाट पोलिसांनी मागितला तीन जणांचा रेकॉर्ड

By admin | Published: August 26, 2016 12:28 AM2016-08-26T00:28:11+5:302016-08-26T00:28:11+5:30

रामपायली येथे शस्त्रे तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चौकशी केल्याची माहिती आहे.

Balaghat police demanded three people's records | बालाघाट पोलिसांनी मागितला तीन जणांचा रेकॉर्ड

बालाघाट पोलिसांनी मागितला तीन जणांचा रेकॉर्ड

Next

शस्त्र तस्करी प्रकरण : पंजाब पोलिसांची गोबरवाही येथे चौकशी
तुमसर : रामपायली येथे शस्त्रे तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चौकशी केल्याची माहिती आहे. तुमसर पोलिसांनी शहरातील तीन युवकांचा पोलिस रेकॉर्ड बालाघाट पोलिसांना दिला. तुमसर शहरातील एका युवकाचा पोलिसात गैरकार्याचा रेकॉर्ड नाही तर इतर दोघांचा आहे.
रामपायली पोलीस ठाण्यांतर्गत भजियादंड येथे शस्त्र तस्करी प्रकरणात दहा युवकांना बालाघाट पोलिसांनी शस्त्रासहीत अटक केली. या कारवाईत तुमसर शहरातील तिघांचा समावेश होता. बालाघाट येथे तुमसर पोलिसांचे एक पथक चार दिवसापूर्वी जावून आले. बालाघाट पोलिसांनीया तिघांचा पोलीस रेकॉर्ड तुमसर पोलिसांना मागितला. तुमसर पोलिसांनी तिघांचा पोलीस रेकॉर्ड बालाघाट पोलिसांना दिला. यात दोन युवकांचा पोलिसात रेकॉर्ड खराब आहे तर एकावर पोलिसात काहीच गुन्हे नाहीत. पंजाब पोलीस एका आठवड्यापूर्वी गोबरवाही येथे येवून गेली. पंजाब पोलिसांनी येथे चौकशी केल्याची माहिती आहे. बालाघाट शस्त्रे तस्करीप्रकरणी पंजाबशी संबंध असल्याचे दिसून येते. पंजाब पोलीस येथे आल्यावर स्थानिक पोलिसांशी संपर्क करत नाही असे दिसून येते.
बालाघाट पोलीस शस्त्रे तस्करीप्रकरणी गोपनीय माहिती, पुरावे गोळा करीत असल्याचे समजते. शस्त्रे खरेदी विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी आहे काय? याचा सध्या तपास सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Balaghat police demanded three people's records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.