बचत गटांमुळे सावकारीला चाप

By admin | Published: December 25, 2014 11:28 PM2014-12-25T23:28:27+5:302014-12-25T23:28:27+5:30

ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण - घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत. शिवाय बचत गटांचा सर्वाधिक

Balance Sheet due to saving groups | बचत गटांमुळे सावकारीला चाप

बचत गटांमुळे सावकारीला चाप

Next

भंडारा : ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण - घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत. शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ सध्या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत होते. मात्र आता बचत गटामुळे अवैध सावकार किंवा बँकेतून शेतकरी कर्ज न घेता सरळ बचत गटातून रक्कम घेत आहेत.
महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात वाढीस लागली आहे. यामुळे सावकारांकडून पैसे घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे एकप्रकारे महिला बचत गटामुळे पुरुषांच्या सावकारीला आळाच बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत आहे. पुरुषाच्या बचत गटाबरोबरच महिलांनीही बचत गटाची स्थापना केली.
या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांना हातभार लागत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा भरात अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांनी लहान मोठे व्यवसाय सुरु केले आहेत.
सध्या ते चांगल्या प्रकारे सुरु आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होत आहे. मागील पाच वर्षात महिला बचत गटाचे प्रमाण वाढले आहे.
या बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबांनाही आर्थिक हातभार लागत आहे. बचत गटातून आर्थिक मदत होत असल्याने अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे दिसते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Balance Sheet due to saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.