बीएएमएस डॉक्टरांचा लक्षवेधी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:23 AM2017-10-07T00:23:39+5:302017-10-07T00:23:54+5:30

आरोग्य योजनेअंतर्गत एनसीआयएसएम बिल २०१७ केंद्र शासनाच्या वतीने नवीन बिल काढण्यात येत आहे.

 BAMS Doctor's Target Frontline | बीएएमएस डॉक्टरांचा लक्षवेधी मोर्चा

बीएएमएस डॉक्टरांचा लक्षवेधी मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या त्या बिलाचा विरोध : निमा संघटनेतर्फे प्रधानमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आरोग्य योजनेअंतर्गत एनसीआयएसएम बिल २०१७ केंद्र शासनाच्या वतीने नवीन बिल काढण्यात येत आहे. यात सदर बिल रद्द करावा अन्यथा त्यात सुधारणा करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील बीएएमएस डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात पंतप्रधानांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन देण्यात आले.
बीएएमएस डॉक्टर संघटना (निमा) अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील डॉक्टरांनी खाजगी दवाखाने व रुग्णालये शुक्रवारी बंद ठेवली होती. तसेच शासकीय, निमशासकीय, १०८ क्रमांकावरील अ‍ॅम्बुलन्स सेवेतील वैद्यकिय अधिकारी यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान शुक्रवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी मोर्चा काढला.
बीएएमएस डॉक्टर हे आरोग्य सेवेचा कणा आहे.
आरोग्य सेवेतही बीएएमएस डॉक्टरांचा ९० टक्के सहभाग आहे. अशास्थितीत अविरत सेवा देवूनही केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात येणाºया बिलामध्ये नविन नियम डॉक्टरांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. निवेदन देताना निमा संघटनेंतर्गत सातही तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title:  BAMS Doctor's Target Frontline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.