आम आदमीने केला निषेध
By admin | Published: March 6, 2017 12:18 AM2017-03-06T00:18:39+5:302017-03-06T00:18:39+5:30
केंद्र सरकारच्या विना अनुदानीत सिलिंडरच्या किमतीमध्ये नुकतीच ८६ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लक्षात घेता,
निवेदन : सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी
भंडारा : केंद्र सरकारच्या विना अनुदानीत सिलिंडरच्या किमतीमध्ये नुकतीच ८६ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लक्षात घेता, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध करीत, सदर दरवाढ कमी करण्यात यावी, दरवाढ कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा आम आदमी पार्टीकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात, केंद्र सरकारच्या विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला आम आमदी पक्ष तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे. केंद्र सरकारने १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ८६ रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे विना अनुदानित सिलेंडरचे मुल्या एकूण ७३७.५० इतके महाग झाले आहे. एकाच दिवसात अशा प्रकार इतकी मोठी दरवाढ ही इतिहासात प्रथमच होत आहे. मागील महिन्यात १ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे प्रती सिलेंडर ६६.६ रुपये इतकी करण्यात आली होती. एकाच महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात १५० रुपये वाढ झाली आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यापासून तब्बल ५८ टक्के म्हणजे जवळपास २७१ रुपये इतकी दरवाढ मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या जनविरोधी धोरणामुळे सामान्य जनतेचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यात ही दरवाढ म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला अजून एक झटका आहे. सबसिडी सोडा या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. एलपीजी गॅसच्या किमती या कच्च्या तेलाच्या किमतीसोबत निगडीत असतात. ही लूट थांबायलाच हवी आहे असे नमूद आहे. शिष्टमंडळात जिल्हा आम आदमी पक्षाचे पदाधिकारी चंचल साळवे, केशव बांते, स्वप्नील भोंगाडे, संघमित्रा गजभिये यांचेसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)