आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:15 PM2019-01-08T22:15:16+5:302019-01-08T22:15:35+5:30

देशात व राज्यात सर्रासपाणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्री व इ-पोर्टल याबाबद न्यायालयाने याविरोधात बंदी देखील केली आहे. शासनाची सकारात्मक भूमिका असल्यामुळे सदर आॅनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी निवेदनातून केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन लाखांदूरच्या वतीने लाखांदूर नायब तहसीलदार विजय कावळे यांना निवेदन देण्यात आले.

Ban online paper sales | आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला

आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला

Next
ठळक मुद्देकेमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनर्फे तुमसर, साकोली, लाखांदुरात निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : देशात व राज्यात सर्रासपाणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्री व इ-पोर्टल याबाबद न्यायालयाने याविरोधात बंदी देखील केली आहे. शासनाची सकारात्मक भूमिका असल्यामुळे सदर आॅनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी निवेदनातून केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन लाखांदूरच्या वतीने लाखांदूर नायब तहसीलदार विजय कावळे यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात राजरोसपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्री व इ-पोर्टल करण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका आहे. हे झाल्यास औषधी व्यवसायीक यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. कुठल्याही औषधी या आॅनलाईन मिळाल्यास युवक वर्ग नशेच्या आहारी जाईल. यातून डुप्लिकेट औषधी पुरवठा होऊन यात जनसामान्यांचे जीवन धोक्यात येईल. या आॅनलाईनमुळे कुणीही कुणाला जबाबदार धरू शकणार नाही.
यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे तालुका अध्यक्ष देवानंद नागदेव, ज्ञानेश धाकळे, राजेश भुरले, राजू बोरकर, प्रदीप बोरकर, बबलू नागमोती, मनोज निमजे, पुरुषोत्तम प्रधान, दत्तू सावरबांधे, श्रीकांत बावनकुळे, प्रशांत नागोसे, नरेंद्र वझाडे, तेजपाल वासनिक, अजय मांढरे व अन्य उपस्थित होते.
आॅनलाईन फॉर्मसीच्या विरोधात आंदोलन
साकोलीत जिल्हा संघटना सचिव शिवशंकर बावनकुळे, तालुका अध्यक्ष हिरालाल पारधीकर, शरद गुप्ता, चंद्रशेखर दोनोडे, राजेश कापगते, पद्माकर बोरकर, प्रकाश कापगते, मोहन बळवाईक, सी.एच. पटले, गुनीलाल बिसेन, पुनेश गायधनी, युवराज तवाडे, दिलीप हुड, बलराज नंदेश्वर आदींनी मागण्यांचे निवेदन सादर केले.
तुमसर येथे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समीर तांगलपल्लीवार, सुनील दुरूगकर, मनोज अग्रवाल, ईरफान इलाही, सुरेश धुंमणखेडे, दिवरू धुर्वे, भागवत सोनवाने, सिहोरा येथील विजय कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ban online paper sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.