मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील एसटी बसेसला प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:00 AM2021-03-22T05:00:00+5:302021-03-22T05:00:41+5:30

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्य प्रदेशात जातात. शेकडाे प्रवासी एसटी बसने मध्य प्रदेशात जातात. तसेच खासगी बसेसचाही उपयाेग केला जाताे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने खबरदारीची उपाययाेजना म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसला प्रतिबंध केला आहे.

Ban on ST buses in Maharashtra in Madhya Pradesh | मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील एसटी बसेसला प्रतिबंध

मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील एसटी बसेसला प्रतिबंध

googlenewsNext
ठळक मुद्देकाेराेना संसर्ग : भंडारा-बालाघाट सात फेऱ्या रद्द, एसटीबस बपेरापर्यंतच

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्रासह विदर्भात काेराेना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ हाेत असल्याने मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रतिबंध केला आहे. तसेच आंतरराज्यीय खासगी बससेवेलाही यामुळे ब्रेक लागणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अपर परिवहन आयुक्तांनी हा आदेश जारी केला असून, त्याची अंमलबजावणी २१ मार्चपासून करण्याचे निर्देशित केले आहे. यामुळे भंडारा- बालाघाट मार्गावरील सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्य प्रदेशात जातात. शेकडाे प्रवासी एसटी बसने मध्य प्रदेशात जातात. तसेच खासगी बसेसचाही उपयाेग केला जाताे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने खबरदारीची उपाययाेजना म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसला प्रतिबंध केला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या ग्वालियर येथील परिवहन आयुक्तांनी १८ मार्च राेजी एक पत्र जारी केले आहे. त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात भंडाऱ्यासह गाेंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागातील विविध आगाराच्या अनेक बसफेऱ्या मध्य प्रदेशासाठी सुरू करण्यात आल्या आहे. बालाघाट, वाराशिवनी मार्गावर अनेक बसेस धावतात. मात्र आता या आदेशामुळे भंडारा विभागातील मध्य प्रदेशासाठी असलेली आंतरराज्यीय बससेवा बंद करावी लागणार आहे. शनिवारी वाराशिवनी येथे जाणारी एसटी बस बफेरा येथे मुक्कामी ठेवली हाेती. भंडारा विभागातून सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र छत्तीसगढ राज्यातील डाेंगरगढ मार्गावरील बसेस सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या काेरेाना संसर्ग वाढत असल्याने विविध उपाययाेजना केल्या जात आहे.

छत्तीसगढच्या सीमेवर ॲन्टिजेन चाचणी
 महाराष्ट्रातून छत्तीसगढ राज्यात जाणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या सीमेवर असलेल्या बाघ नदी परिसरात छत्तीसगढ सरकारने चाचणी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येते. निगेटिव्ह अहवाल आल्यास छत्तीसगढमध्ये प्रवेश दिला जाताे. या ठिकाणी चाचणीसाठी प्रवाशांना एक ते दीड तास ताडकळत राहावे लागत आहे. मात्र काेराेना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही व्यवस्था गरजेची असल्याचे प्रवासी सांगत आहे.

 

Web Title: Ban on ST buses in Maharashtra in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.