बँक व्यवस्थापक मुद्रा लोनसाठी करतात अपमानीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:32 PM2018-09-29T21:32:05+5:302018-09-29T21:32:49+5:30
मोहाडी तालुक्यातील पालोरा अलाहाबाद बँक व्यवस्थापकाच्या कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. मुद्रा लोन मागण्यासाठी बँकेत जाणाºया सुशिक्षित बेरोजगारांना अपमानीत केले जाते. त्यांना मुद्रा लोनची माहिती दिली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा अलाहाबाद बँक व्यवस्थापकाच्या कारभारामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. मुद्रा लोन मागण्यासाठी बँकेत जाणाºया सुशिक्षित बेरोजगारांना अपमानीत केले जाते. त्यांना मुद्रा लोनची माहिती दिली जात नाही. पोलीस स्टेशनला तक्रार करुन फसविण्याचा प्रयत्न करतात. या गैरप्रकारांमुळे बेरोजगार बँकेत जाण्यास घाबरत असून शासन नर्णयाची अवहेलना करणाºया व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पालोरा परिसरातील तक्रारदार सुशिक्षित बेरोजगार चंद्रमनी अशोक खोब्रागडे, रत्नदीप नत्थू मेश्राम, राकेश शत्रूघ्न आराम, संदीप बळवंत खोब्रागडे, योगेश्वर काशिनाथ चिंधालोरे, प्रगत प्रमोद तिरपुडे हे युवक अलाहाबाद बँक शाखा परिसरात वास्तव्याला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती घेण्याकरिता वेळोवेळी बँकेत गेले असता त्यांना व्यवस्थापकांनी माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. योजनेसंबंधाने चालढकल केली जाते. लाभ दिला जात नाही. माहिती विचारल्यास दुसऱ्या दिवशी येण्यास सांगतात. दुसऱ्या दिवशी गेल्यास पुढील तारखेस येण्यास सांगतात. एक प्रकारे युवकांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे धोरण त्यांच्याकडून राबविले जात आहे. एक सुशिक्षित बेरोजगार व्यवस्थापकांना माहिती विचारल्यास पोलीस स्टेशन करडीला खोटी माहिती देवून फसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेरोजगार भयभीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जे व्यक्ती व्यवसाय करीत नाही, अशंना मुद्रा लोन दिले जात असल्याने बेरोजगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.