जिल्ह्यातील बॅनर, होर्डिंग्स हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:05 PM2019-03-12T22:05:04+5:302019-03-12T22:05:36+5:30

गजबजलेल्या चौकात विविध जाहिरातींच्या फलकांनी झालेले विद्रुपीकरण लोकसभेच्या आचारसंहितेने अवघ्या एका दिवसात दूर झाले. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व बॅनर, पोस्टर्स हटविले. परिणामी या चौकांनी मुक्त श्वास घेतला.

Banners in the district, hoardings are deleted | जिल्ह्यातील बॅनर, होर्डिंग्स हटविले

जिल्ह्यातील बॅनर, होर्डिंग्स हटविले

Next
ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : चौकांनी घेतला मोकळा श्वास, पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गजबजलेल्या चौकात विविध जाहिरातींच्या फलकांनी झालेले विद्रुपीकरण लोकसभेच्या आचारसंहितेने अवघ्या एका दिवसात दूर झाले. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व बॅनर, पोस्टर्स हटविले. परिणामी या चौकांनी मुक्त श्वास घेतला.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता १० मार्च पासून लागू झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वप्रथम शहरातील बॅनर्स, पोस्टर्स काढण्याची मोहीम हाती घेतली. जिल्हाभरातील राजकीय पक्षांसह अन्य संस्थांचे बॅनर व होर्डींग्स् काढण्यात येत आहे. बहुतांशपणे ही कामे बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. शहरात विविध चौकांमध्ये मोठमोठाले फलक, बॅनर्स आणि फ्लॅक्स लावण्यात आले आहेत. दिल्लीच्या राजकीय नेत्यांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यांचे मोठाले होर्डींग्स चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा आणत होते. परंतु त्याविषयी कुणीही शब्द बोलालया तयार नव्हते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि एक एक बोर्ड खाली उतरु लागले.
जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर व होर्डींग्स काढण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. आचार संहितेचा भंग होऊ नये याची काटेकोरपणे दक्षताही राजकीय पक्ष घेताना दिसून येत आहेत. राष्ट्रीय महामार्गासह जिल्हाभरातील फलक काढल्याने शहरातील चौक व रस्ते मुक्त श्वास घेतील.
विश्रामगृह ओस
ऐरवी राजकीय पक्षांचे बस्तान असलेल्या विश्रामगृहात सध्या शांतता दिसून येत आहे. आदर्श आचार संहिता काळात कुठल्याही राजकीय पक्षाला शासकीय विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. परिणामी विश्रामगृहात आता शांतता दिसून येत आहे. जवळपास दोन महिने तरी हीच स्थिती कायम राहणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेसह पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची वाहनेही शासनजमा झाली आहेत.

Web Title: Banners in the district, hoardings are deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.