लोकशाहीचा पाया अन् आधार ‘मतदार’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:35 PM2018-01-25T23:35:16+5:302018-01-25T23:35:27+5:30
मतदानाचा प्रमाण अत्यल्प असतो. तसेच मतदाराने आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा. मतदान कर्तव्य समजावे. उदासिनता चिंतेची बाब आहे. मतदान नोंदणी व मतदानाचा हक्कासाठी जागृतीची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मतदानाचा प्रमाण अत्यल्प असतो. तसेच मतदाराने आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा. मतदान कर्तव्य समजावे. उदासिनता चिंतेची बाब आहे. मतदान नोंदणी व मतदानाचा हक्कासाठी जागृतीची गरज आहे. सुजान नागरिक व्हा. नेते विवेकबुद्धीने निवडा. प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा पाया अन् आधार स्तंभ असल्याचे प्रतिपादन तुमसरच्या ३५ विभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी केले.
एन.जे. पटेल महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिल्पा सोनुले बोलत होत्या. तहसीलदार सुर्यकांत पाटील म्हणाले, लोकशाही बळकट होण्यासाठी सहभागी व्हायला हवे. मतदार हा लोकशाही प्रगतीचे प्रतिक आहे. सुलभ निवडणुका ही यावेळची थीम असून सक्षमपणे सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले. एन.जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास राणे, संकुचित निष्ठा समाजकारणात आली. वाईट प्रवृत्ती वाढली. यावेळी नवीन मतदार झालेल्या युवक युवतींना मतदान कार्ड वितरीत करण्यात आले. तसेच निवडणूक ज्ञान परीक्षा झाली त्यात एकनाथ कातकडे, आर.सी. बोरकर, एम.एस. कोहळे, डी.टी. धुळे, आनंद हट्टेवार, आर.एच. भवसागर, प्रभाकर कापगते, भोलेश्वर बारई, श्रद्धा गायकवाड, अश्विन पानतावणे, नितीन ठाकरे, अनिल बोढाले, हेमराज राऊत, राजू भोयर, जे.अे. आकरे, पी.एन. जीभकाटे, पी.आर. भोयर, रमेश गाढवे, बी.जी. गभणे, बी.एन. नाकतोडे यांना प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मतदार जागृती कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, एम.जे. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. विजया राऊत यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच नायब तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम रूचिता शेंडे, द्वितीय माधुरी बारापात्रे, तृतीय निकिता रोडगे, वादविवाद स्पर्धा प्रथम, प्रगती गायधने, द्वितीय अर्पिता आंबिलकर, तृतीय निकिता मानकर, निबंध स्पर्धा प्रथम आचल लेंडे, द्वितीय डिम्पल गायधने तृतीय प्राजक्ता ठवकर, चित्रकला स्पर्धा शमा सुर्यवंशी, द्वितीय रोशनी कोल्हे, तृतीय निशा बावणे, घोषवाक्य स्पर्धा प्रथम प्रणाली आंबिलकर, द्वितीय आचल सेलोकर, तृतीय प्रियांशू मरसकोल्हे, रांगोळी स्पर्धा प्रथम पूजा बडवाईक, द्वितीय भावना जिभकाटे, तृतीय वैभवी सातपैसे, पथनाट्य स्पर्धेत प्रथम सरस्वती कन्या विद्यालय मोहाडी, द्वितीय श्रीराम विद्यालय बेटाळा, तृतीय महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहाडी यांचा क्रमांक आला.
सकाळी जि.प. हाय. सरस्वती कन्या विद्यालय, सुदामा विद्यालय, एम.जे. पटेल कॉलेज या विद्यार्थ्यांनी मतदान जागृती रॅली मोहाडी येथे काढली होती. विद्यार्थ्यांना मतदार जागृतीची प्रतिक्षा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी दिली.