पालकमंत्र्यांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:00 AM2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:01:03+5:30

लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनीे व्यापारी असो की छोटे दुकानदार व कामगारांकडूनही पासेस च्या नावावर ५०० रुपये घेण्याचा सपाटा लावला आहे.

The basket of garbage shown to the order of the Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

पालकमंत्र्यांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

googlenewsNext
ठळक मुद्देआदेशानंतरही दुकानदारांकडून शुल्क वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉक डाऊनमध्ये ग्रीन झोन च्या धर्तीवर शासनाच्या दिशा निदेर्शानुसार सुरु करण्यात आलेले दुकान सुरु करण्यासाठी नगर परिषद तुमसर कडून छोट्या मोठ्या दुकान, व्यवसायाकडून ५०० रुपयांची अवैध वसुली होत असल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. यावर पालकमंत्र्यांनी पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना कोणतेही शुल्क न घेण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेशानंतरही वसुली सुरूच आहे. दुकानदारांकडून व कामगारांकडून अवैध वसुली सुरु ठेवली आहे.
लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनीे व्यापारी असो की छोटे दुकानदार व कामगारांकडूनही पासेस च्या नावावर ५०० रुपये घेण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी येथील पुढाऱ्यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना ते तुमसर तालुक्याच्या दौºयावर असताना निवेदन देऊन तक्रार केली होती.
त्यावेळी आमदार राजू कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर, तहसीलदार गजेंद्र बालपांडे हे उपस्थित होते यांच्या समोरच मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना आपन कुठलेही शुल्क व्यापारी व कामगाराकडुन घेऊ नये असे निर्देश दिले मात्र मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी पालकमंत्रीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शुल्क घेणे सुरु ठेवले आहे. यावर पालकमंत्री कोणती भूमिका घेणार याकडे तुमसर वासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: The basket of garbage shown to the order of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.