-ही तर काळ्या पैशाविरूद्धची लढाई
By Admin | Published: November 16, 2016 12:37 AM2016-11-16T00:37:33+5:302016-11-16T00:40:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत.
नाना पटोले : संयम बाळगण्याचे आवाहन
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत. या अडचणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांना सन्मानाची वागणूक देऊन ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतलेला असून काळा पैसा जमविणाऱ्यांवर वचक बसला आहे. भ्रष्टाचारावर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी बँका प्रयत्नशील असून काही दिवसात सर्व व्यवहार सुरळीत होतील, असेही नाना पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)