भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 08:12 PM2023-05-02T20:12:23+5:302023-05-02T20:13:00+5:30

Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे.

Bavanthadi river flooded in summer! | भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

googlenewsNext

भंडारा : सतत आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सिहोरा परिसरातील नाले तुडुंब भरले आहेत. मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहतूक बंद करण्याचे सूचना देण्यात आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अवकाळी पावसाने संततधारपणे हजेरी लावली आहे. सिहोरा परिसरात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या वैनगंगा आणि बावणथडी बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. वैनगंगा नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. या पाण्याची थोप बपेरा गावापर्यंत आहे. या गावांचे शेजारी दोन नद्यांचा संगम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पर्यंत बावणथडी नदीचे पात्र कोरडे राहते.

नदीच्या काठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देण्यासाठी या चार महिन्यांत राजीव सागर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. परंतु यंदा नदीच्या पात्राचे पूर्णतः चित्र बदलले आहे. आजवर कधी मे महिन्यात बावणथडी नदीला पूर आला नव्हता. परंतु मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. भर उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहून काठावरील गावकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करीत आहेत. नदीला पूर आल्यानंतर वाहनांची ये-जा बंद करण्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यानंतर सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृह ऑपरेटरचे वेतन थकले असल्याने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे.

बावणथडी नदीला पूर आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावरून पुराचे पाणी ओवरफ्लो झाले आहे. धरणाचे उधर्व भागात नदीचे पात्र कोरडे आहे. ओवरफ्लो पाण्याची गती वाढल्यास उधर्व भाग पुराचे पाण्याने समतल होणार आहे. बावणथडी नदीवरील धरणाचे उधर्व भागाचे पात्रातील मध्य प्रदेशातील सरकारने हद्दीतील रेती घाट लिलावात काढले आहे. नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात केले जात आहेत. धरणावरून पाणी ओवरफ्लो झाले असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात येणार आहे.

Web Title: Bavanthadi river flooded in summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर