बावनथडी प्रकल्प वितरिकांचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:11+5:302021-02-14T04:33:11+5:30
तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. ...
तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सिंचन करणाऱ्या वितरिका शेतकऱ्यासाठी वरदान ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरल्या आहेत. माडगी शिवारात एका आठवड्यापूर्वी फुटलेल्या वितरिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वितरिकांचे अस्तरीकरण अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही. वितरिकांची दुरवस्था झाली आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेल्या भावंडे प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. आंतरराज्य प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मागील चार ते पाच वर्षांपासून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळी व उन्हाळी धान पिकाकरिता या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, परंतु अनेक ठिकाणी वितरिका फुटल्या असून, काही वितरिकांना भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तेथे मोठे नुकसान होते. पिके वाहून जातात, पाण्याचा अपव्यय होतो. मुख्य कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले, परंतु लहान वितरिकांचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी करण्यात आले नाहीत. त्यामुळे वितरिकांना भेगा पडतात. सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, वितरिकांना भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुमारे २९ हजार हेक्टर शेती सिंचनाचे लक्ष या प्रकल्पातून करण्यात आले आहे. वास्तविक, २७ हजार हेक्टर शेत जमिनीचे सिंचन प्रत्यक्ष करण्यात येत आहे. बाह्मणी शिवनी शिवारातील काही शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. बैलपर्यंत पाणी जात नसल्याची माहिती आहे. मार्गी शिवारात आठ दिवसांपूर्वी फुटलेल्या वितरिकेतून पाण्याचा विसर्ग केल्याने शेती जलमग्न झाली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे येथे नुकसान झाले. वितरिका दुरुस्तीकरिता सुमारे पन्नास कोटींचा निधी पुन्हा या प्रकल्पाला देण्याची गरज आहे. या आंतरराज्य प्रकल्पच्या जास्त लाभ मध्य प्रदेशाला होत असून, महाराष्ट्राला त्या मानाने कमी लाभ होत आहे. बावनथडीचे उपकालवे व वितरिका तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.