बावनथडी दुथडी वाहूनही पाण्याचा उपसा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:47 AM2018-07-13T00:47:55+5:302018-07-13T00:48:24+5:30

बावनथडी नदी दुथडी भरुन वाहत आहे. परंतु सोंड्याटोला उपसा सिचंन प्रकल्पातून पाण्याचा उपसा केला जात नाही. पावसाने दगा दिला तर सिहोरा परिसरातील ४७ गावे सिचंनापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Bawnthadi can also be used for water supply | बावनथडी दुथडी वाहूनही पाण्याचा उपसा बंदच

बावनथडी दुथडी वाहूनही पाण्याचा उपसा बंदच

Next
ठळक मुद्देतर चांदपूर तलाव कोरडा राहणार : आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये उपसा करण्याचे निर्देश

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी नदी दुथडी भरुन वाहत आहे. परंतु सोंड्याटोला उपसा सिचंन प्रकल्पातून पाण्याचा उपसा केला जात नाही. पावसाने दगा दिला तर सिहोरा परिसरातील ४७ गावे सिचंनापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. नदीतून पाणी उपसा करणरी यंत्रणा सज्ज आहे. पावसाळ्यात गेट उघडण्याचे आदेश नसल्याने पाणी उपसा बंद असल्याचे समजते. तांत्रिक अडचण की नियोजनाचा अभाव हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांकरिता सोंड्याटोला उपसा सिंचन योजना वरदान आहे. परिसरातील ४७ गावे या योजनेमुळे सिंचन कक्षेत योतत. कोट्यवधी रुपये खर्च करुन ही योजना पुर्णत्वास आली. उपसा सिंचन योजनेचे वीज बिल पूर्णत: भरले असून उपसा करणाºया ५ मोटारी सज्ज आहेत. शासनाने वीज बिल भरले. यंत्रे अपडेट केली. सध्या पाऊस पडने सुरु आहे. मध्यप्रदेशातही पाऊस बरसत आहे. बावनथडी नदी दुधडी भरुन वाहत आहे. पंरतु सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा बंद आहे.
पावसाने दगा दिला तर पुढे चांदपूर तलाव कोरडा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे सोंड्याटोला सिंचन प्रकल्पामुळे चांदपूर प्रकल्प विभागाने पाणी उपसा करण्याची मागणी केली नाही. सोंड्या प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी यंत्रसामुग्री, वीज इत्यादी अपडेट केले आहेत. बावनथडी दुथडी भरुन वाहत असताना पाणी उपसा का केले जात नाही अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरु आहे.
आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रकल्पातून पाणी उपसा केला जातो. यावर्षी मान्सूनने पूर्वी व वेळेवर आगमन केले आहे. पुढे मानसूनने दगा दिला तर त्याचा फटका चांदपूर जलाशयाला बसण्याची शक्यता अधिक आहे. मासून हा बेभरवशाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चांदपूर जलाशयावरच सिहोरा परिसरातील शेती निर्भर आहे. त्यामुळे वेळ वाया न दडवता पाणी उपसाचे नियोजन करण्याची गरज आहे.

वीज बिल भरल असून ५ मोटारपंप पाणी उपशाकरिता सज्ज आहेत. चांदपूर प्रकल्पाचे पाणी उपस्याची मागणी केली तर प्रकल्पातून पाणी उपसा करता येईल. मागणी केल्यावरच पाणी उपसा करण्याचा नियम आहे.
- डी.एम. भेलावे, कनिष्ठ अभियंता, सोंड्याटोला उपसा सिंचन योजना
पावसाळ्यात प्रकल्पाचे गेट उघडता येत नाही. गेट पाण्यात वाहून जाण्याची शक्यता अधिक असते. आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यातच पाणी उपसा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला पाणी उपसा करता येत नाही.
- एम जे. मिरत, शाखा अभियंता चांदपूर प्रकल्प
बावनथडी नदी दुथडी भरुन वाहत असताना पाण्याचा उपसा बंद आहे. एक विभाग मागणी करा असे सांगते तर दुसरा विभाग आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाणी उपसा करण्याचे सांगत आहे. पावसाने दगा दिला तर चांदपूर तलाव नियमांनी भरणार काय? तांत्रीक कारण पुढे करण्यात येत आहे.
- हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य तुमसर

Web Title: Bawnthadi can also be used for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.