‘बावनथडी’चे कोट्यवधींचे ‘आऊटलेट्स’ उद्ध्वस्त
By admin | Published: April 1, 2016 01:12 AM2016-04-01T01:12:38+5:302016-04-01T01:12:38+5:30
बावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या.
लोकप्रतिनिधींचे लक्ष जाणार काय? : नवीन बांधकामाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित
मोहन भोयर तुमसर
बावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या. सन २०१२ ते २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामात केवळ आठ ते दहा वेळा पाणी सोडण्यात आले हे विशेष कोट्यवधीचे सिमेंट आऊटलेटस तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला सन १९७६ मध्ये सुरुवात झाली होती. बावनथडी प्रकल्पाचा उजवा मुख्य कालावा असून त्याला समांतर इतर लहान कालवे बांधण्यात आले. या कालव्यांना दगडी लेआऊटलेट सन १९९० च्या सुमारास बांधण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या शेतात या आऊटलेटमधून लहान वितरिकेत कालव्यातून पाणी सोडण्यात येते. तुमसर व मोहाउी तालुक्यात असे दगडी आऊटलेट्स मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. अपवाद वगळता सर्वच आऊटलेटस उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील हिंगणा व काटेबाम्हणी शिवारात प्रत्यक्ष भेट दिली असता हा प्रकार आढळला. सन १९९० पूर्वी राज्यात कालव्याचे आऊटलेटस दगडांचे बांधले जात होते. हे विशेष धरणातून पाणी सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठा जोर असतो हे दगड पाण्याचा प्रवाह सहन केल्रूाची क्षमता नसल्याने या प्रकल्पाचे सर्वच आऊटलेट्स उद्ध्वस्त झाले. दगडी आऊटलेट्स बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर या बांधकामाला सुमारे २५ वर्षे झाली. त्यामुळे या आऊटलेटसचे आयुष्य संपल्याचे बोलले जाते. प्रथम धरण, कालवे बांधल्यानंतर वितरिका व आऊटलेटची कामे करण्याची गरज होती. परंतु या प्रकल्पात प्रथमत: सिमेंट पूल, आऊटलेटस् सारख्या बांधकामाला सुरुवातीपासूनच प्रथम प्राधान्य देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे, वितरिकांचे जाळे तयार करणे ही प्राथमिक कार्ये अजूनही पूर्ण झाली नाहीत तर बांधकामांना २० ते २५ वर्षे होत आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडून वाहून गेले. राज्य शासनाने सन २०१७ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची हमी दिली आहे. उद्ध्वस्त झालेल्या आऊटलेट्स पुन्हा सिमेंट क्राँक्रीटच्या तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे विशेष.