कीडनाशकाबाबत काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:18 PM2017-10-08T21:18:28+5:302017-10-08T21:18:39+5:30
जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून या जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून या जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. १ लाख ५१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी करण्यात आली.वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता यामुळे भात पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव आहे.त्यामुळे पीक संरक्षणासाठी शेतकºयांनी फवारणी सुरू केली आहे. पिकावरील कीड व रोग यांचे नियंत्रण करताना किडनाशके वापरताना ती काळजीपूर्वक हाताळणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
किडनाशके फवारतांना रासायनिक औषधाचे बारीक कण हवेबरोबर नाक, तोंड, त्वचा किंवा डोळ्याद्वारे शरीरात जाते. त्यामुळे जीवास हानी पोहचू शकते. यासाठी किडनाशके वापरण्यापूर्वी लेबल व माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करा. जोराचा वारा वाहत असल्यास फवारणी टाळावी. फवारणीचे वेळी तंबाखू, बिडी, गुटखा, पान आदींचे सेवन करु नये. तणनाशके व कीडनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा तसेच गळते फवारणी यंत्र न वापरता दुरु स्त करु न वापरावे. फवारणी करतेवेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. फवारणी झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. कीटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर नष्ट कराव्यात.
डोळ्यांची घ्या काळजी
डोळ्यात कीटकनाशके गेल्यास ताबडतोब पाण्याचा प्रवाह डोळ्यात सोडून डोळे धुवावेत. डॉक्टर येईपर्यंत सतत डोळे धूत राहावे. किडनाशकाची फवारणी करताना किडनाशक पोटात जाऊन विषबाधा झाल्यास तत्काळ डॉक्टराला बोलवावे. तोपर्यंत पोटात गेलेले विष बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. श्वसनाद्वारे विषबाधा झाल्यास रु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत ठेवावे. रोग्याला घाम येत असल्यास स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसावे. किडनाशके फवारणी करताना शेतकरी बांधवांनी अशाप्रकारे विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या गोष्टींसाठी संरक्षण आवश्यक
धोकादायक किडनाशके वापरताना संरक्षण कपडे जसे रबरी हातमोजे, चष्मा, रबरी बुट, लांब पायजामा घालावा व फवारणी सहा तासापेक्षा जास्त वेळ करु नये. किटकनाशके पोटात गेले असल्यास प्रथमोपचारासाठी पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यासाठी भाग पाडावे. त्यासाठी १५ ग्रॅम मीठ, ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास द्यावे. उलटीद्वारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही कृती करावी. हाताची बोटे अथवा चमच्याचा टोकाकडील भाग घशात घालूनही उलट्या करु न घ्याव्यात. जर रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर वरील उपचार करु नये. श्वसनाद्वारे किडनाशकाची विषबाधा झाली असल्यास
रु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे. खिडक्या व द्वारे उघडावे.
रु ग्णाचे कपडे सैल करावे. श्वासोच्छवास नियमित होत नसल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दयावा. त्वचेवर किडनाशके पडल्यास त्वचा साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवून काढावी.