सावधान ! कार्बाईड गन हिरावू शकते दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:00 AM2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:23+5:30

जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगला लागत आहे. शेत शिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले असतात. अशातच काही महिन्यांपूर्वी गावात देशी जुगाड असलेली कार्बाईड गन विकायला आली. प्लास्टीक पाईप आणि त्यात विशिष्ट गोळा टाकला की निकामी इंजेक्शन सिरिंजमधुन पाणी फवारल्यानंतर मोठा आवाज होतो. त्यामुळे माकड आणि पक्षी पळून जातात. प्राण्यांना कोणताही धोका होत नाही.

Be careful! Carbide guns can deprive vision | सावधान ! कार्बाईड गन हिरावू शकते दृष्टी

सावधान ! कार्बाईड गन हिरावू शकते दृष्टी

Next
ठळक मुद्देअनेकांना अंधत्व : माकड आणि पक्षी पळविण्याचे देशी जुगाड धोकादायक, मुलांना ठेवा गनपासून दूर

  ज्ञानेश्वर मुंदे  
 लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  पशूपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड तंत्राने तयार केलेली कार्बाईड गन आता अनेकांची दृष्टी हिरावत आहे. माकड आणि पक्ष्यांना पळवून लावताना मोठा आवाज करणारी ही गन चालविताना झालेली चूक कायमचे अंधत्वही देत आहे. ग्रामीण भागता अनेकांच्या डोळ्याता जबर इजा झाली आहे. काही महिन्यांपुर्वी गावागावांत ही गन विकणारी मंडळी आली होती. अनेकांनी गरज म्हणून खरेदीही केली. परंतु आता या गनने अनेकांचे डोळे जायबंदी करत रुग्णालयाचा रस्ता दाखवत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगला लागत आहे. शेत शिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले असतात. अशातच काही महिन्यांपूर्वी गावात देशी जुगाड असलेली कार्बाईड गन विकायला आली. प्लास्टीक पाईप आणि त्यात विशिष्ट गोळा टाकला की निकामी इंजेक्शन सिरिंजमधुन पाणी फवारल्यानंतर मोठा आवाज होतो. त्यामुळे माकड आणि पक्षी पळून जातात. प्राण्यांना कोणताही धोका होत नाही. चालवायला सहज सोपी असल्याने अनेकांनी ती खरेदी केली. ग्रामीण भागात अनेकांकडे या कार्बाईड गन दिसून येतात. मात्र आता ही कार्बाईड गन डोळ्यासाठी घातक ठरत आहे. 
मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील एक तरुण कार्बाईड गन चालविताना जखमी झाला. त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली. त्यामुळे त्याने भंडारा येथील एका नेत्र तज्ज्ञाकडे धाव घेतली. त्यात त्या मुलाच्या काॅर्नियाला जखम झाल्याचे दिसून आले. कार्बाईड गनच्या इजेने डोळ्याची बाहुली पांढरी होऊन दिसणे अशक्य होते. शहरातील अनेक नेत्र तज्ज्ञांकडे आठवड्यातून तीन चार व्यक्ती कार्बाईड गनने जखमी झालेले येत असल्याचे दिसत आहे. अनेकदा कार्बाईड गनचा वापर प्राण्यांना हाकलण्यापेक्षा गंमत म्हणूनही अनेक जण करतात. दिवाळीच्या काळात गावात अनेकांनी कार्बाईड गनने मोठा आवाज करुन फटाके फोडण्याचा आनंदही लुटला होता. परंतु हा आनंद आता त्यांची कायमची दृष्टी हिरावत असल्याचे दिसते. 
ग्रामीण भागात देशी जुगाड तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक बाबी केल्या जातात. युट्युब वरील व्हीडीओ पाहूनही अनेकजण असे प्रकार करताना दिसतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. कार्बाईड गन विकायला आल्यानंतर आता अनेकजण तशीच गन प्लास्टीक पाईपपासून तयार करुन त्याचा वापर करीत आहेत. मात्र ते डोळ्याच्या गंभीर इजेला कारणीभूत ठरत आहे.

गावागावांमध्ये विकली जाते दीडशे, दोनशे रुपयाला गन
ग्रामीण भागात ही गन अतीशय लोकप्रिय असून अवघ्या दीडशे ते दोनशे रुपयात तेही दारावर मिळत असल्याने अनेकांनी ती खरेदी केली. साधारणत: सहा सात महिन्यापूर्वी काही मंडळी ही गन घेऊन विक्रीसाठी आले होते. त्यांनी प्रात्यक्षिकांसह गन दाखविल्याने अनेकांनी खरेदी केली. परंतु आता या गनचे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. 

असा होतो अपघात
कार्बाईड गनमध्ये विशिष्ट गोळा टाकल्यानंतर त्याला सिरिंजने पाणी फवारले जाते. परंतु अनेकदा त्यातुन आवाजच येत नाही. त्यामुळे या गनजवळ तोंड नेऊन काय झाले हे बघितले जाते आणि दुर्देवाने त्याच वेळी स्फोट होऊन प्रचंड धूर निघतो. त्या धुरामुळे डोळ्याला इजा होते. गंभीर इजा झाल्यानंतर रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु अनेकदा मोठी दुखापत असल्याने उपचार होत नाही.

गत तीन चार महिन्यांपासून डोळ्याची इजा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता कार्बाईड गनने डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगतात. यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. मोठी मंडळीही आहे. डोळ्याची बाहुली पांढरी झाली तर त्यावर उपचार करणे जवळजवळ अशक्य असते. काही लोकांना तर यामुळे अंधत्वही येऊ शकते. 
- डॉ. दीपक नवखरे, 
नेत्र तज्ज्ञ भंडारा.

 

Web Title: Be careful! Carbide guns can deprive vision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.