सावधान! काेराेना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:28+5:302021-08-18T04:42:28+5:30
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्याभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या निरंक झाली हाेती. जिल्हा काेराेनामुक्त झाला. सर्वांनी सुटकेचा निश्वास साेडला. मात्र काेराेनाने ...
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्याभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या निरंक झाली हाेती. जिल्हा काेराेनामुक्त झाला. सर्वांनी सुटकेचा निश्वास साेडला. मात्र काेराेनाने पुन्हा आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. १४ ऑगस्ट राेजी २९१ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. १५ ऑगस्ट ३३७ चाचणीमध्ये एक व्यक्ती पाॅझिटिव्ह हाेता. मात्र १६ ऑगस्ट राेजी केवळ ४२ व्यक्तींची चाचणी झाली आणि त्यात तब्बल तीन व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. १७ ऑगस्ट राेजी १६० चाचण्यांमध्ये एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळला. यामुळे आता निरंक असलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सहावर जाऊन पाेहाेचली आहे.
१५ ऑगस्टपासून बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ आता पूर्ववत सुरु झाली आहे. परिणामी गर्दी वाढली नागरिक नियमांचे पालन करीत नाही. दुकानदार फिजिकल डिस्टन्सिंगला खाे देत आहेत. यामुळे काेराेना रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.
बाॅक्स
पाच तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण
निरंक झालेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता सहावर पाेहाेचली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा दाेन, माेहाडी, तुमसर, लाखनी आणि साकाेली येथे प्रत्येकी एक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पवनी आणि लाखांदूर तालुक्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही.