धानाची विक्री करताना दक्ष राहावे

By admin | Published: October 29, 2016 12:37 AM2016-10-29T00:37:06+5:302016-10-29T00:37:06+5:30

सध्या धानाचे उत्पादन निघणे सुरु झाले आहे. धानाची इतरत्र ठिकाणी विक्री करताना शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही ..

Be cautious while selling the dice | धानाची विक्री करताना दक्ष राहावे

धानाची विक्री करताना दक्ष राहावे

Next

बाजार समितीचे आवाहन : पत्रक काढून शेतकऱ्यांना केले सावधान
अर्जुनी मोरगाव : सध्या धानाचे उत्पादन निघणे सुरु झाले आहे. धानाची इतरत्र ठिकाणी विक्री करताना शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र तसेच बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आणून विक्री करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती काशिमजमा कुरैशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, प्रभारी सचिव अशोक काळबांधे यांनी काढलेल्या जाहिर पत्रकाद्वारे केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मुख्य बाजार अर्जुनी-मोरगाव, दुय्यम बाजार नवेगावबांध येथे खरीप हंगामातील धानाचे पणन सुरु केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या धानाची विक्री राईस मिल, दुकान, व्यापाऱ्यांचे गोदाम, मध्यस्थांकडून करु नये. मार्केट यार्ड शिवाय इतर ठिकाणी शेतमालाचे पणन करणे अवैध असून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव न मिळता वजनमापाद्वारे साशंकता निर्माण होते. संबंधित व्यापाऱ्याकडून शेतमालाची विक्री रक्कम सुद्धा बिलासह प्राप्त होत नाही असे पत्रकातून शेतकऱ्यांना सजग करण्यात आले आहे.
शासनाचे आधारभूत दर साधारण धान १४७० रुपये, ‘अ’ ग्रेड धान १५१० रुपये असून या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धानाची विक्री होणार नाही याची कास्तकारबांधवांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ च्या खालील नियम १९६७ च्या तरतुदी व उपविधीनुसार बाजार समितीचे नियंत्रणाखाली शेतमालाच्या पणनाचे व्यवहार मार्केट यार्डवर झाल्यास शेतकरी, व्यापारी व अडत्यांना हितावह असून हमाल व शेतमाल वाहतूकदारांना काम मिळून ग्रामीण भागातील संबंधित लोकांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचा आशावाद बाजार समितीच्या जाहिर पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतमाल खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डशिवाय इतरत्र कोठेही राईस मिल, दुकान, व्यापारी गोदाम किंवा खळ्यावरुन शेतमालाची खरेदी करु नये असा सुचक इशारा सुद्धा पत्रकातून देण्यात आला आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डवरुन शेतकऱ्यांच्या धानाची विक्री झाल्यास शेतकऱ्यांकडून कोणतीही ‘अडत’ घेतली जाणार नाही असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

शेतमाल तारण कर्ज योजना
धान एकाचवेळी बाजारामध्ये विक्रीस येत असल्यामुळे भाव कमी मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यास व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याच्या हेतूने सामान्य कास्तकारांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २०१६-१७ या हंगामासाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपला धान शासनाच्या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यानंतर गोदाम पावतीप्रमाणे त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन शेतमाल बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम ६ टक्के व्याज दराने कर्ज स्वरुपात ६ महिन्याच्या मुदतीकरिता बाजार समिती उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Be cautious while selling the dice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.