साकोलीत ओबीसी महासंघाच्या वतीने धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:49+5:302021-06-28T04:23:49+5:30
तहसीलदार यांना निवेदन साकोली : साकोली तालुका ओबीसी महासंघ शाखा साकोलीच्या वतीने ओबीसी समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, निदर्शने ...
तहसीलदार यांना निवेदन
साकोली : साकोली तालुका ओबीसी महासंघ शाखा साकोलीच्या वतीने ओबीसी समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, निदर्शने व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी, अशी मुख्य मागणी आहे. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करत नसेल, तर राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी व महाराष्ट्रातील ओबीसी जनसंख्या समोर आणावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचा कमी झालेले आरक्षण पूर्ववत सुरू करावा, मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करू नका, यासह अन्य मागण्यांसाठी साकोली तालुका ओबीसी महासंघ शाखा साकोलीच्या वतीने धरणे, निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार रमेश कुंभारे यांना देण्यात आले.
निवेदन देताना ओबीसी महासंघ साकोलीचे तालुका अध्यक्ष उमेश कठाणे, जिल्हा समन्वयक प्रभाकर सपाटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शेंडे, जिल्हा महासचिव सतीश समरित, राधेश्याम खोब्रागडे, सुरेश बोरकर, वसंत मारवाडे, हरगोविंद भेंडारकर, मार्तंड भेंडारकर, अनिकेत कठाणे, मोहित भेंडारकर, संजय बडवाईक, अक्षय चिरवतकर, भोजराज उके व अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.