धीर धरा, स्वतःला सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:15+5:302021-06-04T04:27:15+5:30
पवनी : संवेदनशील मनाची अचूक अशी चुणूक दाखवीत नयनचक्षूमध्ये तरळत्या अश्रूंना सांभाळीत भेदरलेल्या व कोरोनाच्या संकटाने जर्जर झालेल्या कुटुंबीयांना ...
पवनी : संवेदनशील मनाची अचूक अशी चुणूक दाखवीत नयनचक्षूमध्ये तरळत्या अश्रूंना सांभाळीत भेदरलेल्या व कोरोनाच्या संकटाने जर्जर झालेल्या कुटुंबीयांना धीर देत घाबरू नका, स्वत:ला सांभाळा, असा आत्मविश्वास निलज, काकेपार गावातील कोरोनाने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिला.
मोहन पंचभाई निलज येथील उके कुटुंबीयांच्या घरी पोहोचले. कोरोनाने उके कुटुंबातील मुलगा व आई यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष मुलगा व घरची बाई गेली. माझ्या नातवाचे कसे होईल, असे म्हणत थकलेल्या बापाने टाहो फोडला. कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मोहन पंचभाई गहिवरले. स्वतःला सांभाळा, धीर धरा प्रशासन व मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे, असे म्हणत उके कुटुंबाला मायेची ऊब दिली. सेवा माझे व्रत आहे. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांना गरजेनुसार मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. शिवाय शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे आश्वासन निलज, काकेपार येथील नागरिकांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिले.