अन्यायाच्या विरोधात लढण्यास तयार राहा
By admin | Published: February 3, 2016 12:42 AM2016-02-03T00:42:01+5:302016-02-03T00:42:01+5:30
अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे. लढा देण्यासाठी संघटन मजबूत असावे लागते. कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढत आहेत.
अमर राठोड यांचे प्रतिपादन : संघटना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
मोहाडी : अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे. लढा देण्यासाठी संघटन मजबूत असावे लागते. कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. शासन मात्र कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराची त्रैवार्षिक सभा साईराम आयटीआय येथे पार पडली. सभेला मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष अमर राठोड बोलत होते. मंचावर सरचिटणीस जे.डी. जाधव, सुधाकर आडे, शंकर राठोड, गेमसिंग आडे, राजू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य जे.डी. जाधव यांनी संघटना ट्रेड युनियन अॅक्ट अन्वये नोंदणीकृत असल्याचे शासकीय निमशासकीय कार्यालयाला संघटनेच्या तक्रारीला उत्तर देणे बंधनकारक असल्याची माहिती दिली.
यावेळी सुधाकर आडे, गेमसिंग आडे, डॉ.मधुकर जाधव, रवींद्र राठोड, प्रा.संतोष जाधव, शालीक राठोड, प्रा.यशपाल यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी बहुमताने निवडण्यात आली. अध्यक्ष नंदकिशोर जाधव, सचिव डी.के. राठोड, कार्याध्यक्ष सुंदर राठोड, उपाध्यक्ष रविंद्र राठोड, शैलेश चव्हाण, सहसचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष दिनेश राठोड, सल्लागार शंकर राठोड, गेमसिंग आडे, सुंदरसिंग राठोड, प्रवक्ता दारासिंग चव्हाण, उत्तम राठोड, जिल्हा संघटक पंजाब राठोड, तालुका संघटक भंडारा संदिप राठोड, तुमसर कैलाश चव्हाण, मोहाडी विजय जाधव, साकोली भारत राठोड, लाखनी रमेश जाधव, पवनी प्रा.पृथ्वीराज पवार, वसंत पवार, लाखांदूर शेषराव पवार यांची निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)