राष्ट्रवादीमध्ये असल्याचा अभिमान बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:49 PM2018-09-07T22:49:26+5:302018-09-07T22:49:47+5:30
महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लाखांदूर येथे गुरूवारला आशिर्वाद मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, विधानसभा अध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला आगाशे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती देविदास राऊत, नरेश दिवटे, नगरसेवक देवानंद नागदेवे, महिला अध्यक्षा कल्पना जाधव, शंकर खराबे, दिपक चिमनकर, रामचंद्र परशुरामकर आदी उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, सध्याचे भाजप सरकार पळपुटे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. महागाईने कंबरडे मोडलेली जनता आता पर्याय शोधत आहे. लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान जाहीर करण्यात आलेले तुडतुड्याची रक्कम तिन महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही मिळाली नाहीत. त्यामुळे जनतेला भाजपला मतदान करायचे नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला पर्याय निर्माण करा. त्यासाठी मतदारांच्या घरा-घरापर्यंत पोहोचा.
यावेळी खासदार मधुकर कुकडे म्हणाले, सन २०१४ मध्ये मोठी लाट आली. या लाटेत अनेकांना दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. गावातील ग्रामपंचायतच्या कार्यालयातही कधी न गेलेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेला माणूस थेट देशाच्या संसदेत गेला. जनतेच्या मानसिकतेचा विचार करुन भाजपने खोटा प्रचार केला. त्यामुळे ही लाट निर्माण झाली होती. परंतु, आता लाट पुर्णपणे ओसरली आहे. यापुढे कोणतीही लाट येणार नाही. हवेवर, वातावरणावर निवडणूक होणार नाही. लाट ही केवळ एकदाच येते, सारखीच येत नाही. त्यामुळे भविष्य आपले आहे.
दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले. आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य रक्तदान शिबिरात युवा कार्यकर्त्यांनी राँकात प्रवेश केला. रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ५० जणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकॉ तालुकाध्यक्ष बालु चुन्ने यांनी केले. संचालन राकेश राऊत तर आभार प्रदर्शन आभार राकेश झोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राँका युवक अध्यक्ष अॅड. मोहन राऊत, धनराज हटवार, चंद्रशेखर खेडीकर, शिलमंजू सिंहगडे, विनोद ढोरे, जितू सुखदेवे, साईनाथ रक्तपेढी नागपुरचे डॉ. अनिल ढोणे, डॉ. सतिश सोनवाने व चमू यांनी सहकार्य केले.