अस्वलाशी दोन हात पण प्रशासनापुढे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:29 PM2019-02-12T21:29:17+5:302019-02-12T21:29:40+5:30

अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालो. आरडाओरडीने अस्वल पळूनही गेली. अस्वलासोबतची झुंज सोपी होती पण प्रशासनासोबत तीन महिने केलेला संघर्ष महाकठीण. हे अनुभव आहेत, सहा महिन्यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गराडा येथील एका शेतमजुराचे. डॉक्टरांच्या चुकीने मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या या शेतमजुराने प्रशासनासोबत अक्षरश: झुंज करून मदत मिळविलीच.

The bear is two hands but the hottable before the administration | अस्वलाशी दोन हात पण प्रशासनापुढे हतबल

अस्वलाशी दोन हात पण प्रशासनापुढे हतबल

Next
ठळक मुद्देगराडाचा मजुराचा संघर्ष : मदतीसाठी झिजविले उंबरठे, वैद्यकीय अहवालातील चुकीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालो. आरडाओरडीने अस्वल पळूनही गेली. अस्वलासोबतची झुंज सोपी होती पण प्रशासनासोबत तीन महिने केलेला संघर्ष महाकठीण. हे अनुभव आहेत, सहा महिन्यापूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गराडा येथील एका शेतमजुराचे. डॉक्टरांच्या चुकीने मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या या शेतमजुराने प्रशासनासोबत अक्षरश: झुंज करून मदत मिळविलीच.
लाखनी तालुक्यातील गराडा येथील शिवदास मिताराम बनकर (४०) हा २ आॅगस्टच्या सकाळी सरपण आणण्यासाठी माडगी जंगलात गेला. ९ वाजताच्या सुमारास दोन पिले सोबत असलेल्या अस्वलाने हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरडाओरडीने अस्वल पळून गेल्यानंतर आपल्या मुलाला मोबाईलवरून माहिती दिली. मुलाने तात्काळ लाखनीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी टाळू आणि डोळ्याजवळ सुमारे ३० ते ३५ टाके घालण्यात आले. १५ दिवस रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर रुग्णालयातून सुटी दिली. वैद्यकीय प्रमाणपत्र देताना मात्र डॉक्टरांनी नजरचुकीने म्हणा अथवा कोणत्या कारणाने किरकोळ जखमी असा उल्लेख केला आणि येथेच घात झाला.
वन्य प्राण्यांनी जखमी केल्यानंतर वन विभागाच्या वतीने शासकीय मदत दिली जाते. या मदतीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. शिवदास हे प्रमाणपत्र घेऊन वनविभागात गेला. तेव्हा त्यावर किरकोळ जखमी असा उल्लेख असल्याने एक हजार रुपये मदत मिळेल असे सांगितले. यामुळे तो हतबल झाला. ३० ते ३५ टाके असतानाही डॉक्टरांनी किरकोळ जखमी लिहिल्याचा त्याला फटका बसला. रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची मनधरणी केली. परंतु उपयोग होत नव्हता. आता आपल्याला शासकीय मदत मिळणार नाही असे त्याला वाटत होते. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांची भेट झाली. त्यांना सर्व कहाणी सांगितली. त्यांनी थेट शिवदासला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. डॉक्टरांना जाब विचारला. गंभीर जखमीची व्याख्या नेमकी काय? असे विचारले. आपली चूक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तात्काळ योग्य रिपोर्ट तयार करून दिला. त्यानंतर वनविभागाकडे अर्ज करण्यात आला. तेथेही त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला. यात तीन महिने गेले. अलिकडेच शिवदास बनकर यांना वनविभागाच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. अस्वलाशी झालेली झुंज काही क्षणाचीच होती, परंतु प्रशासनासोबत सातत्याने तीन महिने त्यांना संघर्ष करावा लागला.
अखेर सव्वा लाखांची मदत
किरकोळ जखमी ठरविल्याने शिवदास मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. कोणतेही मार्गदर्शन नाही. शासकीय कार्यालयांचा अनुभव नाही. मात्र याही परिस्थितीत त्याने मदतीसाठी संघर्ष केला आणि वनविभागाने अखेर त्याला एक लाख २५ हजारांची मदत दिली.

Web Title: The bear is two hands but the hottable before the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.