व्याजाच्या पैशावरून मारहाण, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:19+5:302021-07-07T04:44:19+5:30

प्रभूषण ऊर्फ लहानशा देवानंद मेश्राम (वय ३०), रा. ठाणा असे जखमीचे नाव आहे. त्यांचा बहिणीचा जावई प्रज्ज्वल गजभिये यांनी ...

Beaten on interest money, one injured | व्याजाच्या पैशावरून मारहाण, एक जखमी

व्याजाच्या पैशावरून मारहाण, एक जखमी

Next

प्रभूषण ऊर्फ लहानशा देवानंद मेश्राम (वय ३०), रा. ठाणा असे जखमीचे नाव आहे. त्यांचा बहिणीचा जावई प्रज्ज्वल गजभिये यांनी सहा महिन्यांपूर्वी रोहित संजय तांदूळकर (२०)याच्याकडून नऊ हजार रुपये व्याजाने घेतले होते. व्याजासह रक्कम मिळविण्यासाठी सोमवारी रात्री ९.३० वाजता सुमारास रोहित तांदूळकर व त्याचे वडील संजय तांदूळकरने (४५) प्रज्ज्वलला फोन केला. मात्र हा फोन प्रभूषण मेश्राम यांनी उचलला. लॉकडाऊन असल्याने काम बंद आहे. त्यामुळे पैसे आताच परत करू शकत नाही, असे सांगितले. काही वेळात संजय तांदूळकर व रोहित तांदूळकर पाच ते सहा व्यक्तींना घेऊन गजभियेच्या घरी आले. तेथे मोठा वाद झाला. यात प्रभूषण मेश्राम यांना धक्काबुक्की करून हातातील कड्याने डोक्यावर मारले. त्यात तो रक्तबंबाळ झाला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची तक्रार प्रभूषण मेश्राम यांनी जवाहरनगर ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Beaten on interest money, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.