लोकवर्गणीतून तुमसर मोक्षधाम परिसराचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:42 AM2021-09-17T04:42:21+5:302021-09-17T04:42:21+5:30
तुमसर : येथील मोक्षधाम परिसरात लोकवर्गणीतून मोक्षधाम सौंदर्यकरण सेवा समितीच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून मोक्षधाम परिसरात सौंदर्यीकरण करण्याचे काम ...
तुमसर : येथील मोक्षधाम परिसरात लोकवर्गणीतून मोक्षधाम सौंदर्यकरण सेवा समितीच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून मोक्षधाम परिसरात सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यात दोन महिन्यांत मोक्षधामचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अनेक देणगीदारांच्या लोकवर्गणीतून हे काम सुरू आहे. त्याअंतर्गच मोक्षधाम प्रवेशद्वार व अस्थिविसर्जन घाटाचे भूमिपूजन देणगीदार नारायणराव तितिरमारे, आमदार राजू कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या प्रमुख हस्ते दोन्ही कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
समितीद्वारे मोक्षधाममध्ये निर्माणाधीन कामाची उपस्थित मान्यवरांकडून स्तुती करण्यात आली. याप्रसंगी विचार व्यक्त करताना माजी खासदार मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने बोरिंग व आरओ वाॅटर मशीन आणि ३० बाय ३० चे शेड निर्माण करून देऊ, असे घोषित केले. याला आमदार राजू कारेमोरे यांनी स्वीकृती प्रदान केली. कंत्राटदार छोटू तुरकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीत स्व. लक्षमणराव तुरकर अस्थी विसर्जन घाट, सहा मीटरचे बनवून देण्याचे यावेळी घोषित केले. यावेळी मोक्षधाम सेवा समितीचे पदाधिकारी सदस्य व नगरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन समितीचे सचिव अनिल कारेमोरे यांनी केले, तर समितीचा लेखाजोखा व आभार समितीचे अध्यक्ष बंडू बांडेबुचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोहन बोरघरे, विनोद लांजेवार, प्रशांत आंबिलढुके, विष्णू जोशी, बालू मस्के, सुरेश समरीत, राजेश मानवांनी, शरद तितिरमारे, आशिष कुकडे, सुनील पारधी, सचिन बोपचे, तरुण साधवानी, बाल्या मदनकर, नवनाथ मेश्राम, विवेक पाहुणे, महेश इखारे, सुनील लांजेवार, दिनेश जावरानी, प्रकाश सिंगनजुडे, शंकर राऊत, रुषी खोब्रागडे, शंकरदादा बडवाईक, भरत भेदे, ठाकूर वासनिक, सुशील आगाशे, संदीप कटकवार, सुधीर आगाशे, तोषल बुरडे, विजय गिरीपुंजे, कमलाकर निखाडे, राजू गौरे, राजू कुकडकर, पवन पाटील यांनी अथक प्रयत्न केले.