साकोली तलावाचे सौंदर्यीकरण करणार
By admin | Published: September 20, 2015 01:11 AM2015-09-20T01:11:52+5:302015-09-20T01:11:52+5:30
मागील कित्त्येक वर्षापासून माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत होती.
मामा तलावांची दुुरूस्ती : बाळा काशीवार यांची माहिती
साकोली : मागील कित्त्येक वर्षापासून माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत होती. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने ही मागणी फेटाळली होती. मात्र भाजप सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांचे व मासेमार बांधवांचा विचार करून विदर्भातील १,७४३ मामा तलावांची दुरुस्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला. याचा सर्वात जास्त फायदा भंडारा व गोंदिया जिल्ह्याला होणार आहे, अशी माहिती आ. बाळा काशिवार यांनी दिली.
साकोली येथील तलावाच्या सौंदर्यीकरणाचाही प्रस्ताव असून त्याचेही काम लवकरच सुरु होणार आहे. यापुर्वी हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे मामा तलावांची अवस्था फार खराब झाली आहे. दरवर्षी येणारा पाऊस येतो जातो मात्र तलावात पाणीच साठत नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे. माजी मालगुजारी तलाव ही बऱ्याच वर्षापूर्वी तयार करण्यात आली असून तेव्हापासून या तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता घटली व हे तलाव फक्त देखावे म्हणून राहू लागली.
या तलावांची दुरुस्ती करून तलावातील गाळ काढण्यात यावी, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, यासाठी भाजपने मागील पंधरा वर्षापासून मागणी केली. मात्र ती मागणी मंजूर करण्यात आली नाही. अखेर भाजपाची सत्ता येताच ही मागणी पूर्ण झाली. (तालुका प्रतिनिधी)