साकोलीला सौंदर्यीकरणाचा फटका
By admin | Published: September 19, 2015 12:46 AM2015-09-19T00:46:27+5:302015-09-19T00:46:27+5:30
जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे.
साकोली : जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे. साकोली येथील चौक, रस्ते व गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा आहे.
अतिक्रमण निर्मूलनाकरीता नगरपंचायत व तहसील कार्यालय मोहीम राबवित असले तरी ती केवळ औपचारिकताच असते. या अतिक्रमणाच्या समुळ उच्चाटनाकरिता त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दरवेळी उघडकीला येते. या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र रोज कोडी होते. शहराची लोकसंख्या २० हजारांच्या वर आहे.
याच ठिकाणी असलेल्या साकोली शहरात रोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. शहरात मुख्य बाजारपेठ, शासकीय निमशासकीय विविध कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, आरोग्य व्यवस्थेच्या सर्व सोयी आहेत. येथे रस्त्याच्या कडेला किंवा जेथे थोडीसी मोकळी जागा मिळाली तेथे निलज आणि कायद्याला न जुमानता सर्रासपणे अतिक्रमण केले जाते.
अतिक्रमणधारकावर कायद्याचा आणि पालिका प्रशासनाचा वचक राहिला नाही. तसेच अतिक्रमण धारकांना सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कायद्याची पायमल्ली केली जाते. चौकासह प्रत्येक गल्लीबोळात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मताच्या राजकारणात अतिक्रमणाच्या समस्येकडे व तक्रारीकडे कानाडोळा केला जातो. कोणी तक्रार केली तरी त्यावर संबंधित विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.
जर एखादेवेळी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली तरी ती केवळ औपचारीकताच सध्या साकोली येथील एकोडी रोड ते पोलीस स्टेशनपर्यंत भाजी विक्रेते व फुटपाथ दुकानदार रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटून बसत आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत तर तहसील कार्यालयासमोर वाहनांच्या अडचणीमुळे समस्या बीकट होत चालली आहे. या समस्येकडे प्रशासनाने कधी डोळे उघडून पाहिलेही नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)