कंत्राटी नर्सेसच्या पुनर्नियुक्तीसाठी कचेरीसमोर ‘भीक मागो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:16+5:302021-09-04T04:42:16+5:30

भंडारा : कोरोना महामारीच्या कठीण काळात जिवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी नर्सेसना पुनर्नियुक्ती, नवीन ...

'Beg' movement in front of the office for re-appointment of contract nurses | कंत्राटी नर्सेसच्या पुनर्नियुक्तीसाठी कचेरीसमोर ‘भीक मागो’ आंदोलन

कंत्राटी नर्सेसच्या पुनर्नियुक्तीसाठी कचेरीसमोर ‘भीक मागो’ आंदोलन

Next

भंडारा : कोरोना महामारीच्या कठीण काळात जिवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी नर्सेसना पुनर्नियुक्ती, नवीन भरती व रिक्त जागेवर कंत्राटी नर्सेसची थेट नियुक्ती करावी तसेच एएनएमला प्राधान्य तसेच नियुक्त होईपर्यंत बेरोजगारी भत्ता इत्यादी मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर कंत्राटी नर्सेसचा ताटी-वाटी ठोको व भीक मागो आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हिवराज उके, कंत्राटी नर्सेस शिष्टमंडळाच्या सचिव मनीषा तीतिरमारे, लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम यांनी केले. कंत्राटी नर्सेसना तीन महिन्यांच्या सेवेनंतर १३ जुलैपासून कामावरून कमी करण्यात आले. तेव्हापासून मंत्र्यांपासून आमदार, खासदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊनही काहीच उपयोग झाला नाही. साधे पाठपुराव्याची पत्रही देऊ शकले नाही. म्हणून २५ ऑगस्टपासून कामावरून काढलेल्या कंत्राटी नर्सेस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाचा आज दहावा दिवस होऊनही संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याचे बघून शुक्रवारला शासन प्रशासनाचे आंदोलनाकडे व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ताटी-वाटी ठोको व भीक मागो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. त्यात मागण्यांबाबत शासनाकडे लगेच पाठपुरावा करतो व तसे तुम्हास पत्र देतो, तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे ते म्हणाले.

जोपर्यंत शासन प्रशासनाची भूमिका स्पष्ट होत नाही व तसे लिखित पत्र मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन चालू राहील. तसेच आंदोलनाची दखल घेत आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. यावेळी हिवराज उके, अचल मेश्राम, मनीषा तीतिरमारे, नंदा कोसरकर, सीमा चौधरी, ऋतुजा साठवणे, उमिजा बुरडे, साधना आगाशे, माया बिसणे, अश्विनी शहारे, स्नेहल वाघमारे, ज्योती बारस्कर, पवित्रा मेश्राम, माधुरी पवारे, पल्लवी झंझाड, ज्योती कोडवते, मोनिका धोटे, कविता कायते, शीतल निर्वाण, छबूताई उके, भाग्यश्री शेंडे, संगीता करसायन, शुभांगी खरोले, रिता मेश्राम, वाल्मीक नागपुरे, गणेश चिचामे, रत्नाकर मारवाडे, प्रकाश उईकेे इत्यादींचा समावेश होता.

Web Title: 'Beg' movement in front of the office for re-appointment of contract nurses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.