विविध कार्यकारी संस्था सदस्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:15+5:302021-01-16T04:39:15+5:30

साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असलेल्या संस्थेलाच साकोली तालुक्यातील निलज येथे खरेदी केंद्र चालविण्याची परवानगी ...

Behind the hunger strike of various executive body members | विविध कार्यकारी संस्था सदस्यांचे उपोषण मागे

विविध कार्यकारी संस्था सदस्यांचे उपोषण मागे

Next

साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असलेल्या संस्थेलाच साकोली तालुक्यातील निलज येथे खरेदी केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे याविरोधात निलज विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सदस्यांनी या केंद्रासमोर उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात आ. डॉ. परिणय फुके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

सन २०१९ - २०मध्ये या केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्याने या गैरव्यवहारामुळे केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान, गत आठवड्यात हे वादग्रस्त खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते. यासंदर्भात विविध सेवा सहकारी संस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरूद्ध पुकारलेल्या बेमुदत उपोषणाच्या सहाव्या दिवशी आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच तुमचा प्रश्न सोडवून दोषींवर योग्य ती कार्यवाही करायला प्रशासनाला भाग पाडू, अशी ग्वाही दिली. जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गैरव्यवहारामध्ये सहभागी संचालक मंडळ रद्द करण्याचे निर्देश दिले होते.

त्याअनुषंगाने आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिलेल्या निर्देशानुसार १३ जानेवारीला जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी जिल्हा उपनिबंधक यांना पत्र देत, चौकशी करून संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे, असे आदेश दिल्याचे आमदार फुके यांनी उपोषणस्थळी बसलेल्या शेतकऱ्यांना सांगितले.

उपोषणाला बसलेले उपसरपंच परमानंद गहाने, संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव अरसोडे, डोमा गहाने, मधुकर गहाने, रामजी वखारे, ओम अरसोडे, सुरेश गहाने व परिसरातील शेतकरी यांना आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

यावेळी अविनाश ब्राह्मणकर, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, भोजराम कापगते, रवी परसुरमकर, विकास कापगते, दीपक हिवरे, राजेश शहारे, यादोराव कापगते उपस्थित होते.

Web Title: Behind the hunger strike of various executive body members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.