लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

By admin | Published: October 10, 2015 01:07 AM2015-10-10T01:07:33+5:302015-10-10T01:07:33+5:30

साकोली : रोजगार हमी योजनेची मजूरी मिळाली नसल्याने बुधवारपासून बोदार येथे आमरण उपोषण सुरू होते.

Behind the written assurance | लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

Next

प्रकरण बोदरा येथील : चौकशी करून कारवाई करणार
साकोली : रोजगार हमी योजनेची मजूरी मिळाली नसल्याने बुधवारपासून बोदार येथे आमरण उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकून त्याची मजुरी खात्यात जमा करण्याचे आश्वासन मिळाल्यावर आज उपोषणकर्त्यांना निंबूपाणी पाजून उपोषण सोडण्यात आले.
सहा महिन्यापासून मजुरांना रोजगार हमीचे पैसे मिळाले नाही. ते त्वरीत देण्यात यावे यासाठी भारतीय कॅम्युनिष्ट पार्टीच्या वतीने शांताराम शेंडे, नरेश राऊत, महादेव गजबे व भजनदास मानकर यांनी बोदरा ग्रामपंचायतसमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले. खंडविकास अधिकारी डॉ. सबाना मोकाशी यांनी दहा दिवसात मजुरी बँक खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. कुंभलीचे जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी उपोषणकर्त्यांना निंबूपाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी नायब तहसीलदार दिवाकर खोत उपस्थित होते. मजूरी व अन्य मागण्या प्रकरणी चौकशी करून त्यावरही मार्ग काढण्यात येईल, असेही आश्वासन खंडविकास अधिकारी डॉ. मोकाशी यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Behind the written assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.