मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:58 AM2019-05-26T00:58:00+5:302019-05-26T00:58:38+5:30

माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.

Being a driving force on mobile phones became 'style' | मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, अपघाताच्या संख्येत वाढ, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.
एका तरुणाने कानात हेडफोन घालुन 'राँग साईड'ने गाडी चालवत समोरुन आलेल्या एका वृध्दाला धडक दिल्याच्या प्रकरणात तरुणाला न्यायालयाने दिलेली शिक्षा हे नुकतेच उदाहरण आहे. मात्र अशी अनेक उदाहरणे शहरात सर्रास घडतात.
एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तारेवरची कसरत करीत आहेत. तर दुसरीकडे अल्पयीन वाहन चालकांची संख्या वरचेवर वाढत असून उनाड तरूण इतर वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर पोलिस लगाम घालतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीब असो की श्रीमंत घराण्यातील तरूण वाहन चालविण्याच्या हट्ट माता पित्यांकडे करीत आहेत. वाहन चालविण्यासाठी वयोमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक आहे. असे असतांनाही माता पिता हट्ट पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलांकडे वाहनांचा ताबा सोपवितात. अशा प्रयत्नात अनेक मुले बळी पडत असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. परंतु लगाम बसत नसल्याचे दिसून येते.
शहरातील मुख्य रस्त्यावरून कट मारणे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनीना पाहून हिरोगिरी करणे, दोन्ही कानात हेडफोन लावुन गाणे ऐकत कुणांशीतरी संभाषण करीत वाहन चालविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इतर वाहन धारकांना त्याचा परिणाम भोगावा लागतच आहे. परंतु वाहन चालविणाºया अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागत आहे. याकडे पालकांना लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी यावर लगाम घालणे अत्यंत गरजचे बनले आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई मात्र नगण्य आहे. यामुळे वाहनचालकांचे मनोबल उंचावले असून वाहतूक नियमांची अमंलबजावणी होत नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज
महत्वाच्या ठिकाणी वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर असणे आवश्यक आहे. यातून वाहनधारकांवर कारवाई करत अपघात आणि वाहन चालवताना मोबाईल वापर करणाºयांवर आळा बसवता येईल. त्यासाठी शहरात सीसीटी कॅमरे लावणे गरजेचे झाले आहे.
कारवाई शून्य
वाहन चालविताला भ्रमणध्वीवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजही तरूण तरूणी भ्रमणध्वनीवर संभाषण करत वाहन चालविण्याची स्टाईल करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशावेळी आजूबाजूंनी किंवा पाठीमागून आलेल्या वाहनांचा थांगपत्ता लागत नाही. अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून थातूर मातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास सदर प्रकार थांबवून होणाºया अपघातापासून निदान सुटका तरी होऊ शकते. परंतु पोलिस योग्य ती कारवाई करीत नसल्याने अशा मुलांचे बळ वाढत आहे.

Web Title: Being a driving force on mobile phones became 'style'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल