विश्वातील प्रत्येक जीव भगवंताचा अंश असल्याने तो आस्तिक असतो
By admin | Published: November 8, 2016 12:35 AM2016-11-08T00:35:45+5:302016-11-08T00:33:15+5:30
विश्वातील असा एक जीव नाही जो भगवान रामाशी प्रेम करत नाही. या विश्वात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात,
धर्म अध्यात्म : सुश्री महेश्वरीदेवीजी यांचे प्रवचन
भंडारा : विश्वातील असा एक जीव नाही जो भगवान रामाशी प्रेम करत नाही. या विश्वात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात, एक आस्तिक व दुसरा नास्तीक. आस्तिक म्हणजे भगवंताला मानणारा तर नास्तीक म्हणजे भगवंताला न मानणारा होय. त्याच प्रकारे विश्वातील कार्य दोन प्रकारचे असतात. एक मानसिक व दुसरा शारीरिक होय. तिसरा म्हणजे शारीरिक अधिक मानविक होय. या प्रत्येक कार्यामागे एक प्रयोजन असते, ते म्हणजे सुख अथवा आनंद असल्याचे प्रतिपादन सुश्री माहेश्वरी देवीजी यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान मंदिर, म्हाडा कॉलोनी, रामनगर भंडारा येथे सुरु असलेल्या दार्शनिक प्रवचनमध्ये सुश्री महेश्वरी देवीजी श्रोत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी, मुर्खातील मुर्ख व्यक्ती सुद्धा या प्रयोजनाने कार्य करतो. मुर्ख कोणाला म्हणो याकरिता गीतेमध्ये सांगितले आहे की, जो आपल्याला जाणत नाही, मग जो आपल्याला जाणत नाही म्हणजे तो वेडा नव्हे का? मग जगच वेड्याचे इस्पीतळ भगवंतांनी तयार केले आहे. जे एक दुसऱ्यासाठी वेडे असतात.
विश्वातील सामान्य संसारातील सुखाकरिता वेडा आहे तर संत हे भगवंताच्या प्रेमासाठी वेडे आहेत. तर भगवंत हे भक्ताच्या प्रेमासाठी वेडे आहेत. या ब्रम्हांडामधील अनंत डोही जीव केवळ आनंदाची इच्छा करतात. तो आनंद पाच प्रकारच्या सामानानी मिळतो. तो म्हणजे शब्द, स्पर्श, गंध, ऐकणे आणि पाहणे. हे संसारातील आनंद सीमीत असते. यामध्ये परस्पर विरोधी क्रिया असतात. उदाहरणार्थ बोलणे आणि चूप राहणे. जेव्हा कामावरून घरी परततो तेव्हा कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता शांतता हवी असते. तर घरातील सर्वच लोक बाहेर गेल्यास घरी जी शांतता असते ती खायला धावते. हा जीव चार प्रकारच्या क्रियानी आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याला जीवन हवे असते तो कोणत्याही वाईट परिस्थितीत तो मरू इच्छीत नाही. ज्ञान प्राप्त करू इच्छीतो मग तो कोणत्याही प्रकाराने असेल. तो स्वतंत्र राहायला पसंत करतो, गुलामी नव्हे. सर्वावरती शासन करू इच्छीतो. सर्व माझ्या अंडरमध्ये राहावे असे त्याला वाटतो. ही आनंद प्राप्त करण्याची वृत्ती केव्हापासून आली आहे. जेव्हा तो जन्माला आला तेव्हापासून. कारण जन्मत: जो दु:ख त्याला झाला तो रडून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदाची वाट धरतो. कारण तो भगवंताचा अंश आहे. कोणताही अंश आपल्या अंशीशी नैसर्गिक प्रेम करतो. जसे की दिव्याची ज्योत ही वर जाते. कारण ती अग्नीची अंश आहे. आपण भगवंतांशी केव्हापासून प्रेम करतो. जेव्हापासून भगवान आहे. भगवान केव्हापासून जेव्हापासून केव्हा नव्हता.
अशाप्रकारे जीव हा नेहमी आनंदाची इच्छा करतो. आनंद आणि भगवान हे पर्यायवाची आहेत. म्हणून जीव आनंदाला मिळवू इच्छीतो. म्हणजेच भगवंताना मिळवू इच्छीतो. म्हणूनच तो आस्तिक आहे आणि निरंतर राहणार. भक्ताची गर्दी प्रवचनात वाढत असून ते भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे आपल्या मधुरवाणीने उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. (जिल्हा प्रतिनिधी)